आजपासून ‘बेस्ट’ महागणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2018 05:45 AM2018-04-12T05:45:57+5:302018-04-12T06:25:12+5:30

बेस्ट उपक्रमाला वाचविण्यासाठी तयार करण्यात आलेल्या कृती आराखड्यानुसार प्रवासी भाड्यात वाढ करण्यास, मुंबई महानगर प्रादेशिक वाहतूक प्राधिकरणानेही (एमएमआरटीए) हिरवा कंदील दाखविला आहे.

'Best' to be expensive today | आजपासून ‘बेस्ट’ महागणार

आजपासून ‘बेस्ट’ महागणार

Next

मुंबई : बेस्ट उपक्रमाला वाचविण्यासाठी तयार करण्यात आलेल्या कृती आराखड्यानुसार प्रवासी भाड्यात वाढ करण्यास, मुंबई महानगर प्रादेशिक वाहतूक प्राधिकरणानेही (एमएमआरटीए) हिरवा कंदील दाखविला आहे. त्यानुसार, बुधवारी मध्यरात्रीपासून ही भाडेवाढ लागू होत आहे. त्यानुसार, पहिल्या चार किलो मीटरपर्यंत बस भाड्यात कोणतीही वाढ नाही. त्यानंतर, ६ ते ३० किलोमीटरपर्यंत १ ते १२ रुपये अशी भाडेवाढ असणार आहे. शालेय विद्यार्थ्यांनाही या दरवाढीचा फटका बसणार आहे.
आर्थिक डबघाईला आलेल्या बेस्टने काटकसरीच्या उपाययोजना केल्यास, मदत करण्याची तयारी पालिकेने दाखविली आहे. त्यानुसार, कामगारांचे भत्ते गोठविणे, बस भाड्यात वाढ, अनेक योजना बंद करण्याची शिफारस या कृती आराखड्यात करण्यात आली होती. या आराखड्याची अंमलबजावणी केल्यास, ५०४ कोटी १८ लाख रुपये बचत होईल, असा दावा बेस्टने प्रशासनाने केला आहे. या प्रस्तावाला बेस्ट समिती, पालिकेतील स्थायी समिती आणि महासभेची मंजुरी मिळाली आहे.
>अशी आहे वाढ
बेस्टच्या दैनंदिन बस पासमध्येही ७० ते ९० रुपयांची वाढ झाली आहे. विद्यार्थ्यांच्या बसपासमध्ये ५० रुपयांची वाढ आहे. वातानुकूलित बसच्या तिकिटांत किमान ५ रुपयांची वाढ आहे. बेस्टने काही दिवसांपूर्वीच बोरीवली, ठाणे, मुलुंड आणि खारघर ते वांद्रे-कुर्ला संकुलादरम्यान सुरू केलेल्या बसच्या तिकिटांमध्येही वाढ करण्यात आली आहे. बेस्टची दरवाढ करताना एमएमआरटीएची मंजुरी आवश्यक असते. ही अंतिम मंजुरीही आज झालेल्या प्राधिकरणाच्या बैठकीत मिळाली आहे. 2018-19चा ८८० कोटी ८८ लाख रुपये तुटीचा अर्थसंकल्प बेस्ट समितीने सादर केला आहे.
प्रस्तावित भाडेवाढ पुढीलप्रमाणे....
शालेय बस पास
मासिक त्रैमासिक वार्षिक
पाचवी पर्यंत २०० ६०० १,०००
सहावी ते दहावी २५० ७५० १,२५०
११, १२ वी पदविका ३५० १,०५० १,७५०
साधी बस भाडेवाढ
(आकडेवारी रुपयांमध्ये )
किमी सध्याचे प्रस्तावित एसी
भाडे भाडे
२ ८ ८ २०
४ १० १० २५
६ १४ १५ ३०
८ १६ १८ ३५
१० १८ २२ ४०
१२ २० २५ ४५
१४ २२ २८ ५०
२० २६ ३४ ६५
३० ३० ४२ ९५

Web Title: 'Best' to be expensive today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :BESTबेस्ट