मुंबई : बेस्ट उपक्रमाचा २०१६-१७ या वर्षाकरिताचा अर्थसंकल्प अंदाज महाव्यवस्थापक डॉ. जगदीश पाटील यांनी बेस्ट समितीला शुक्रवारी सादर केला. अर्थसंकल्प अंदाजानुसार बसगाड्या अत्याधुनिक करण्यासह प्रवाशांना उत्तम सेवा देण्यावर बेस्टचा भर असणार आहे. महत्त्वाचे म्हणजे वीज क्षेत्राची हानी कमी करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा आधार घेण्यात येणार आहे. नव्या उपकेंद्रांची स्थापनाही होणार आहे. अर्थसंकल्प अंदाजानुसार, विद्युत पुरवठा विभागात एमजीएम संग्राही उपकेंद्र आणि वानखेडे स्टेडियम येथे संग्राही ऊर्जा रोहित्रासह नवीन उपकेंद्र सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. माझगाव, एक्सप्लनेड उपकेंद्र, पोचखानवाला रोड, लोढा क्राऊन वडाळा ट्रक टर्मिनल येथेही अतिरिक्त ट्रान्सफॉर्मर बसवण्याचे नव्या वर्षात प्रस्तावित आहे. त्यामुळे यंत्रणेमध्ये ९६ एमव्हीए एवढी वाढ होईल. परळ, शीतलादेवी, महालक्ष्मी आणि कसारा येथेही ट्रान्सफॉर्मर बदलण्याचे प्रस्तावित आहे. त्यामुळे तेथे २४ एमव्हीने क्षमता वाढेल आणि यंत्रणेतही सुधारणा होईल. परिणामी वितरणहानी रोखण्यासही याची मदत होणार आहे.माझगाव, शीतलादेवी आणि नेव्हल डॉक उपकेंद्रातील कालबाह्य झालेले स्वीचगिअर्स बदलण्याचा प्रस्ताव आहे. ३५ नवीन वितरण उपकेंद्रे कार्यान्वित होतील. सर्व वितरण केंद्रांत फॉल्ट पॅसेज इंडिकेटर्स बसविण्याचेही प्रस्तावित आहे. यामुळे उच्चदाब तारखंडातील दोषांची माहितीही तत्काळ उपलब्ध होणे शक्य होईल. विद्युत पुरवठा विभाग शाखेत पीस प्रकल्पांतर्गत वीज बिल तयार करण्याच्या पद्धतीत आमूलाग्र बदल करण्यात येणार आहेत. शिवाय ग्राहकांची माहिती अद्ययावत करण्यासाठी आॅनलाइन ग्राहकसेवा पद्धत विकसित करण्यात येईल. (प्रतिनिधी)वेळापत्रकाचे संगणकीकरण होणार, आॅनलाइन ग्राहकसेवा पद्धती विकसित होणार, वेळापत्रकाच्या संगणकीकरणावर बेस्टकडून प्रथमच भरबसचालक, वाहकांच्या कामाची सुरुवात-कार्यसमाप्ती बस आगाराऐवजी बसस्थानकामध्ये करण्याची पद्धत पाच आगारांमध्ये सुरू, उर्वरित बस आगारांमध्येही लवकरच होणार या कार्यपद्धतीचा अवलंब प्रवाशांची सुरक्षा सर्वोच्चब्लुमबर्ग रस्ते सुरक्षा प्रकल्पांतर्गत जागतिक स्तरावरील दहा शहरांमध्ये मुंबईची निवड करण्यात आली आहे. या प्रकल्पांतर्गत प्रवाशांच्या सुरक्षितेकरिता आवश्यक उपाययोजनांचा अवलंब करण्यात येणार आहे. हा प्रकल्प पाच वर्षांचा आहे. यादीत असलेल्या जगातील प्रत्येक शहराला प्रवाशांसाठीच्या प्रकल्पासाठी तब्बल ६५ कोटींचे अर्थसाहाय्य मिळणार आहे. प्रवाशांसाठी महत्त्वाची माहिती प्रवासी माहिती पद्धतीचा अवलंब करण्याचे प्रस्तावित आहे. या अंतर्गत मध्यवर्ती नियंत्रण कक्ष, बसस्थानके, बस चौक्या, बसथांब्यावर माहितीदर्शक फलक प्रदर्शित करण्यात येणार आहेत. सद्य:स्थितीत उपक्रमाच्या सर्व बसगाड्यांवर माहितीसाठी आवश्यक साधनसामग्री उपलब्ध करण्यात आली आहे. प्रवाशांसाठी ही माहिती बेस्टच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अर्थसंकल्पाची वैशिष्ट्ये- केव्ही नवीन उपकेंद्र, केव्ही क्षमता वाढवण्यावर भर - आॅनलाइन ग्राहकसेवा पद्धती, बसगाड्यांच्या वेळापत्रकाचे संगणकीकरण- स्मार्ट शहरे प्रकल्प - प्रवासी माहिती प्रणाली, रस्ते सुरक्षा पुढाकार - ब्लुमबर्ग प्रकल्प- बसप्रवास आकर्षक, किफायतशीर होण्यासाठी प्रयत्न, बस आगारांचे पुनर्निर्माण- वातानुकूलित मिडी बसेस, सीएनजी बसगाड्यांवरील क्लच आॅपरेटिंग यंत्रणेत सुधारणा
मुंबईकरांसाठी ‘बेस्ट’च बेस्ट
By admin | Published: October 10, 2015 4:53 AM