Join us

बेस्ट, सुधार समिती निवडणुकीत शिवसेना विरुद्ध भाजप, काँग्रेस सामना

By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2020 7:49 AM

जुन्या मित्राला शह देण्याचे मनसुबे : पाठिंब्यावर ठरणार पुढील गणिते

मुंबई : बेस्ट आणि सुधार या दोन वैधानिक समित्यांच्या अध्यक्ष पदासाठीही काँग्रेस आणि भाजपने गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. दोन्ही समित्यांमध्ये भाजपपेक्षा शिवसेनेकडे दोन अधिक संख्याबळ आहे. मात्र काँग्रेसच्या उमेदवारीमुळे भाजपचे हात बळकट झाले आहेत. जुन्या मित्रपक्षाला मात देण्यासाठी ऐनवेळी भाजपने काँग्रेसला पाठिंबा दिल्यास शिवसेनेला पराभवाचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.

भाजपने गेल्या निवडणुकांमध्ये समिती अध्यक्षपदासाठी उमेदवार उभे केले नव्हते. तसेच राज्यात शिवसेनेबरोबर सत्तेवर असल्याने काँग्रेसनेही शिवसेनेला पाठिंबा दिला होता. मात्र यावर्षी उभय दोन्ही पक्षांकडून शिवसेनेविरोधात उमेदवारी दाखल करण्यात आली आहे. बेस्ट समिती अध्यक्षपदासाठी शिवसेनेकडून प्रवीण शिंदे आणि सुधार समितीसाठी सदानंद परब यांनी पालिका चिटणीसांकडे उमेदवारी अर्ज सादर केला.तर, बेस्टसाठी भाजपकडून प्रकाश गंगाधरे आणि काँग्रेस राष्ट्रवादी समाजवादी पक्षाकडून विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. सुधार समिती अध्यक्षपदासाठी विरोधी पक्षाकडून काँग्रेसचे जावेद जुनेजा यांनी तर भाजपकडून विनोद मिश्रा यांनी अर्ज सादर केला. स्थायी समितीनंतर महत्त्वाच्या समित्या असलेल्या सुधार व बेस्ट समिती अध्यक्षपदाची निवडणूक ६ आॅक्टोबर रोजी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे होणार आहे.'बेस्ट' समितीमध्येशिवसेना ८, भाजप ६, काँग्रेस २ आणि राष्ट्रवादीचा एक सदस्य आहे.सुधार समितीतशिवसेना १२, भाजप १०, काँग्रेस २, राष्ट्रवादी आणि सपाचे प्रत्येकी १ सदस्य आहेत.भाजप ऐनवेळी उमेदवारी अर्ज मागे घेत काँग्रेस उमेदवाराला पाठिंबा देऊन शिवसेनेला धक्का देऊ शकतो.शिवसेनेसमोर पेच... काँग्रेस निर्णायकशिवसेनेकडे सर्वाधिक ९५ संख्याबळ असल्याने सर्वच समित्यांमध्ये त्यांचे भाजपपेक्षा दोन सदस्य अधिक आहेत. निवडणुकीपूर्वी काँग्रेसची मनधरणी करून उमेदवारी मागे घेण्यास भाग पाडता येईल, असा विश्वास शिवसेना नेत्यांना आहे. त्यामुळे काँग्रेसची अवघी दोन मतेही निर्णायक ठरणार आहेत.

टॅग्स :बेस्टमुंबई