अंध-अपंगांना ‘बेस्ट’ मोफत

By admin | Published: March 11, 2016 04:15 AM2016-03-11T04:15:03+5:302016-03-11T04:15:03+5:30

अंध आणि अपंग प्रवाशांना यापुढे बेस्टच्या बसगाड्यांमधून मोफत प्रवास करता येणार आहे़ याबाबतचा निर्णय सर्वपक्षीय गटनेत्यांच्या बैठकीत आज घेण्यात आला़ यासाठी पालिका अर्थसंकल्पात

'Best' for blind-disabled | अंध-अपंगांना ‘बेस्ट’ मोफत

अंध-अपंगांना ‘बेस्ट’ मोफत

Next

मुंबई : अंध आणि अपंग प्रवाशांना यापुढे बेस्टच्या बसगाड्यांमधून मोफत प्रवास करता येणार आहे़ याबाबतचा निर्णय सर्वपक्षीय गटनेत्यांच्या बैठकीत आज घेण्यात आला़ यासाठी पालिका अर्थसंकल्पात निधीची तरतूद करण्यात येणार आहे़ तत्पूर्वी या प्रवासाबाबतचे निकष ठरविण्यात येणार आहेत़
गटनेत्यांच्या बैठकीत आज अनेक विषयांवर चर्चा झाली़ पालिकेची आगामी निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून अनेक महत्त्वाचे निर्णय या बैठकीत घेण्यात आले़ शिवसेना अपंग सहाय्य सेना, सिद्धिविनायक अंध, अपंग संस्था व अन्य अंध, अपंग संघटनांनी मोफत प्रवासासाठी मागणी केली होती़ ही मागणी आज मान्य करण्यात आली़, तसेच बाणगंगा येथील तलावात बुडणाऱ्या मुलीस वाचविणारा १२ वर्षीय मोहित दळवी या मुलाला पर्यायी घर देण्याचा निर्णय गटनेत्यांच्या बैठकीत घेण्यात आला़ दळवी याला प्रकल्पबाधितांसाठी असलेल्या सदनिकांमध्ये घर
देण्यात येईल, अशी माहिती महापौर स्नेहल आंबेकर यांनी या बैठकीतनंतर दिली़
क्रिकेटपटू धनावडेचा सत्कार
क्रिकेट जगतात केलेल्या जागतिक विक्रमाबद्दल कल्याणचा क्रिकेटपटू प्रणव धनावडे याचा सत्कार करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे़ (प्रतिनिधी)
> खासगी प्रवासी वाहतुकीला सेनेचा विरोध
मुंबई: खासगी वाहतूकदारांना राज्यात प्रवासी वाहतुकीची परवानगी देण्यास शिवसेनेने विरोध केला आहे़ अशी परवानगी दिल्यास, महिलांची सुरक्षा धोक्यात येऊन नवी दिल्लीतील निर्भया प्रकरणाची पुनरावृत्ती
होऊ शकते़ त्यामुळे खासगी प्रवाशी वाहतुकीला परवानगी देऊ नये,
अशी मागणी सभागृह नेत्या
तृष्णा विश्वासराव यांनी परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्याकडे केली
आहे़
केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी खासगी प्रवासी वाहतुकीला परवानगी देण्याची घोषणा अर्थसंकल्पातून केली आहे़ मात्र, नवी दिल्लीतील निर्भयाप्रकरणानंतर खासगी वाहतूक सुरक्षित नसल्याचे उजेडात आले आहे़ मुंबईत बेस्ट बसमध्ये प्रवास करणे महिलांना सुरक्षित वाटते़ खासगी वाहतूकदारांना प्रवासी वाहतुकीची परवानगी दिल्यास ही सुरक्षा धोक्यात येईल, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: 'Best' for blind-disabled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.