सामंजस्य करारावर सह्या करणाऱ्यांनाच ‘बेस्ट’ बोनस

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2019 03:47 AM2019-09-28T03:47:15+5:302019-09-28T03:47:24+5:30

१२ हजार कर्मचाऱ्यांनाच मिळणार लाभ

The 'best' bonus is only for those who sign a reconciliation agreement | सामंजस्य करारावर सह्या करणाऱ्यांनाच ‘बेस्ट’ बोनस

सामंजस्य करारावर सह्या करणाऱ्यांनाच ‘बेस्ट’ बोनस

Next

मुंबई - बेस्ट प्रशासन आणि शिवसेना प्रणीत बेस्ट कामगार सेनेबरोबर झालेल्या सामंजस्य करारावर अन्य संघटनेतील कामगारांनी सह्या केलेल्या नाहीत. मात्र हा करार अमान्य करणाºया कर्मचाºयांना वेतनवाढ व दिवाळी सणानिमित्त देण्यात येणारे सानुग्रह अनुदान नाकारण्यात येत आहे. त्यामुळे सामंजस्य करारावर सही करणाºया सुमारे १२ हजार कर्मचाºयांनाच हा लाभ मिळणार आहे.

बेस्ट कर्मचाºयांनी आपल्या विविध मागण्यांसाठी जानेवारी महिन्यात बंद पुकारला होता. नऊ दिवसांचा हा बंद यशस्वी झाल्यामुळे लवादाच्या मध्यस्थीने बेस्ट प्रशासन आणि कामगार संघटनांमध्ये वाटाघाटी सुरू झाल्या. मात्र ही चर्चाही निष्फळ ठरल्यामुळे शिवसेना प्रणीत बेस्ट कामगार सेनेने प्रशासनाबरोबर चर्चा करून सामंजस्य करारावर सही केली. या चर्चेपासून कृती समितीचे नेते शशांक राव दूर राहिले.

राव यांच्या बेस्ट वर्कर्स युनियनने हा करार अमान्य केला आहे. त्यामुळे या संघटनेच्या कर्मचाºयांना सानुग्रह अनुदान वेतनवाढीसाठी लढा द्यावा लागणार आहे. बेस्ट कर्मचाºयांना ९१०० रुपये सानुग्रह अनुदान जाहीर केले आहे. परंतु करारावर स्वाक्षरी करणाºया कामगारांनाच सानुग्रह अनुदान मिळणार आहे. या दबावतंत्राविरोधात बेस्ट वर्कर्स युनियनने ९ आॅक्टोबर रोजी संपाची हाक दिली आहे.

Web Title: The 'best' bonus is only for those who sign a reconciliation agreement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :BESTबेस्ट