बेस्टच्या वीज दरवाढीला मान्यता!

By admin | Published: April 16, 2015 02:08 AM2015-04-16T02:08:02+5:302015-04-16T02:08:02+5:30

महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाने बेस्ट विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रमाला वीज दरात वाढ करण्यास परवानगी दिली आहे.

Best boost in power! | बेस्टच्या वीज दरवाढीला मान्यता!

बेस्टच्या वीज दरवाढीला मान्यता!

Next

मुंबई : महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाने बेस्ट विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रमाला वीज दरात वाढ करण्यास परवानगी दिली आहे. त्यानुसार, १०० युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या ग्राहकांना ३ रुपये तर १०१ ते ३०० युनिटपर्यंतच्या ग्राहकांना ६ रुपये ४० पैसे अदा करावे लागणार आहेत. १ एप्रिल २०१५ पासून
हे वीजदर लागू झाले असून, ते ३१ मार्च २०१६ पर्यंत लागू राहणार आहेत.
बेस्ट विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रमाने यासंदर्भातील माहिती बुधवारी प्रसारमाध्यमांना दिली. त्यानुसार बेस्टच्या १०० युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या ग्राहकांना ३ रुपये तर १०१ ते ३०० युनिटपर्यंतच्या ग्राहकांना ६ रुपये ४० पैसे एवढी किंमत मोजावी लागणार आहे. २०१३ सालीच बेस्टने आयोगाकडे वीज दरवाढीचा प्रस्ताव दाखल केला होता. हा वीज दरवाढीचा प्रस्ताव ‘बहु दर’(मल्टी टेरिफ) होता. २०१३ साली आयोगाने २०१४, २०१५ आणि २०१६ या वर्षांसाठी दरवाढीला मंजुरी दिली होती. त्यानुसारच हे वीजदर लागू करण्यात आल्याचे उपक्रमातर्फे स्पष्ट करण्यात आले.
(प्रतिनिधी)

च्टाटा पॉवरने १०० युनिटपर्यंतच्या वीज वापरासाठी २ रुपये ६२ पैसे आणि १०१ ते ३०० युनिटपर्यंतच्या वीज वापरासाठी ४ रुपये ५६ पैसे दरवाढ मागितली आहे.
च्महावितरणने राज्यातील औद्योगिक ग्राहकांवरील वीजदराचा भार कमी करण्यासाठी आयोगाकडे सरासरी ८ टक्के दरवाढीचा ४ हजार ७१७ कोटी रुपयांचा प्रस्ताव सादर केला आहे.
च्रिलायन्सनेही सरासरी १८ ते २० टक्के दरवाढीकरिता १८०० कोटी रुपयांचा प्रस्ताव आयोगाकडे सादर केला आहे.

च्मुंबईत बेस्ट, टाटा, रिलायन्स, महावितरणकडून विजेचा पुरवठा होतो.
च्शहरात बेस्ट आणि टाटा तर उपनगरात टाटा, रिलायन्स, महावितरण वीज पुरवठा करते.
च्टाटाला शहरातही वीज पुरवठा करण्याचा परवाना मिळाला आहे.
च्शहरात बेस्ट विरुद्ध टाटा असे ‘शीतयुद्ध’ रंगले आहे.
च्उपनगरात टाटा आणि रिलायन्समध्ये स्पर्धा आहे.

बेस्टचे वीजदर (रुपये/किलोवॅट अवर)
युनिट१ एप्रिलपूर्वीचे१ एप्रिल २०१५
लागू झालेले दर
०-१००२.६५३
१०१-३००५.३५६.४०
३०१-५००७.५०८.८०
५०१९.५५१०.८०

च्२०१३ साली आयोगाने २०१४, २०१५ आणि २०१६ या वर्षांसाठी दरवाढीला मंजुरी दिली होती. त्यानुसारच हे वीजदर लागू करण्यात आल्याचे उपक्रमातर्फे स्पष्ट करण्यात आले.

Web Title: Best boost in power!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.