Join us

बेस्टचे २ लाचखोर अधिकारी गजाआड

By admin | Published: July 30, 2016 1:43 AM

बेस्टच्या दोन वरिष्ठ मीटर निरिक्षकांना शुक्रवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) ८ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ अटक केली. प्रशांत मालवे(५१) आणि उदय वेदांते

मुंबई : बेस्टच्या दोन वरिष्ठ मीटर निरिक्षकांना शुक्रवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) ८ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ अटक केली. प्रशांत मालवे(५१) आणि उदय वेदांते (४२) अशी अटक आरोपींची नावे आहेत. २६ जुलैला मालवे व वेदांते यांनी तक्रारदाराला थकलेले बील व दंडाची रक्कम असे मिळून सव्वा दोन लाख रूपरे भरण्याबाबतच नोटीस बजावली. ही नोटीस देण्यासाठी दोघेही त्यांच्या घरी गेले. मात्र तक्रारदार यांनी नोटीस स्वीकारली नाही. २७ जुलैला तक्रारदार यांनी ई वॉर्ड येथे या दोन्ही अधिकाऱ्याची भेट घेतली. तेव्हा बील व दंडाची रक्कम भरण्यासाठी दोन महिन्यांची मुदत वाढ देण्याकरता दोन्ही अधिकाऱ्यांनी तक्रारदाराकडे १० हजार रूपरांची लाच मागितली होती. (प्रतिनिधी)