ठळक मुद्दे बस ड्राइवरच्या केबीनमध्ये असलेल्या इलेक्ट्रिक बोर्डला आग लागली. बसचालकाने बस ब्रिजच्या खाली घेऊन फायर सिलेंडरने आग विजवली.
मुंबई - माटुंगा येथील महेश्वरी उद्यानाजवळ बेस्टच्या बसने घेतला पेट असून अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहचले आहे. अग्निशमन दलाचे जवान आग विझविण्याचे काम करत आहेत. आज दुपारी ४.३० वाजताच्या सुमारास ही आग लागली आहे. बेस्टच्या वरळी डेपोची बस रूट क्रमांक २७ ची बस मुलुंड येथून वरळीकडे येत असताना महेश्वरी उद्यान ब्रिजवरून जात असताना बस ड्राइवरच्या केबीनमध्ये असलेल्या इलेक्ट्रिक बोर्डला आग लागली. बसचालकाने बस ब्रिजच्या खाली घेऊन फायर सिलेंडरने आग विजवली. या घटनेत कोणीही प्रवासी जखमी नसून सुखरूप असल्याची माहिती मिळत आहे.