संपादरम्यान अर्धांगवायूचा झटका आलेल्या बेस्ट बसचालकाचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2019 02:40 PM2019-01-21T14:40:22+5:302019-01-21T14:42:09+5:30

संपादरम्यान डेपोत सामील झाले असताना त्यांना पहाटे अर्धांगवायूचा झटका आला. त्यावेळी तातडीनं त्यांना उपचारांसाठी सायन येथील लोकमान्य टिळक रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे.

The best bus driver died after the paralyzed blow | संपादरम्यान अर्धांगवायूचा झटका आलेल्या बेस्ट बसचालकाचे निधन

संपादरम्यान अर्धांगवायूचा झटका आलेल्या बेस्ट बसचालकाचे निधन

Next
ठळक मुद्दे ते बेस्टचे चालक होते असून सायन रुग्णालयात उपचारादरम्यान काल सकाळी त्यांचं निधन झालं. च्या शरीराची डावी बाजू काम करत नव्हती. रवींद्र यांना तात्काळ गोवंडीच्या शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. 

मुंबई - बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपादरम्यान चौथ्या दिवशी रवींद्र काशिनाथ वाघमारे (४२) यांना अर्धांगवायूच्या झटका आला होता. ते बेस्टचे चालक होते असून सायन रुग्णालयात उपचारादरम्यान काल सकाळी त्यांचं निधन झालं. अर्धांगवायूचा झटका आला त्यावेळी रवींद्र हे देवनार डेपोत होते. रवींद्र हे संपात सहभागी होते. संपादरम्यान डेपोत सामील झाले असताना त्यांना पहाटे अर्धांगवायूचा झटका आला. त्यावेळी तातडीनं त्यांना उपचारांसाठी सायन येथील लोकमान्य टिळक रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे वाघमारे कुटुंबावर मोठं संकट कोसळलं आहे. 

बेस्टचे चालक रवींद्र वाघमारे हे खारघरला राहत असून त्यांना दीड वर्षांची मुलगी आहे. संपाच्या चौथ्या दिवशी देवनार बस डेपो इथं रवींद्र कामावर आले होते. त्यावेळी सकाळी आठ वाजेच्या सुमारास त्यांना अस्वस्थ वाटत होते. त्याचवेळी रवींद्र यांना अर्धागवायूचा झटका आला आणि त्यांच्या शरीराची डावी बाजू काम करत नव्हती. रवींद्र यांना तात्काळ गोवंडीच्या शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, त्यांची प्रकृती अधिक खालावल्यानं लोकमान्य टिळक रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. अखेर उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 

Web Title: The best bus driver died after the paralyzed blow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.