बेस्ट बस पासचे सुसूत्रीकरण
By admin | Published: August 8, 2015 01:57 AM2015-08-08T01:57:12+5:302015-08-08T01:57:12+5:30
विद्यार्थ्यांच्या बेस्ट बस पासची भाडेवाढ गुरुवारी महापालिकेच्या सभागृहात रद्द करण्यात आल्यानंतर बेस्ट प्रशासनाने तत्काळ विद्यार्थ्यांसाठीच्या नियमित बसपास
मुंबई : विद्यार्थ्यांच्या बेस्ट बस पासची भाडेवाढ गुरुवारी महापालिकेच्या सभागृहात रद्द करण्यात आल्यानंतर बेस्ट प्रशासनाने तत्काळ विद्यार्थ्यांसाठीच्या नियमित बसपास, विशेष बसफेऱ्यावरील बसपास दराचे सुसूत्रीकरण केले आहे. हे दर १० आॅगस्ट (सोमवार)पासून अंमलात येणार आहेत.
बेस्ट उपक्रमाच्या बससेवेमध्ये सद्य:स्थितीत वातानुकूलित बससेवा वगळता सर्वसाधारण, मर्यादित
आणि जलद कॉरिडॉर बससेवांवर १२ वर्षे वयापर्यंतच्या मुलांकरिता सवलतीचे प्रवासभाडे आकारण्यात येते.
नियमित बसपासचे मूल्य (रुपये)
इयत्तामासिकत्रैमासिकसहा महिने
दहावी१५०४५०७५०
बारावी३००९००१५००
वातानुकूलित बससेवांचे प्रौढ प्रवासभाडे
व सवलतीच्या प्रवासभाड्याचा तपशील
किमीप्रौढ सवलत
२३०१५
४३५१५
६५५२५
१०६५३०
१४८०४०
किमीप्रौढ सवलत
२०१००५०
३०११५५५
४०१४०७०
५०१६०८०
६०१८०९०
शनिवारपासून अन्य बससेवांप्रमाणेच वातानुकूलित बससेवांवरदेखील
12
वर्षे वयापर्यंतच्या मुलांस सवलतीचे भाडे आकारण्यात येणार आहे.