Join us  

बसपास दरात ‘बेस्ट’ कपात

By admin | Published: July 09, 2015 1:42 AM

या वर्षी दोन वेळा भाडेवाढ करणाऱ्या बेस्ट प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या पासच्या दरामध्येही दुप्पट वाढ केली़ यामुळे पालकांमध्ये प्रचंड रोष पसरला असून ही वाढ कमी करण्यासाठी राजकीय दबाव आणण्यात येत आहेत़

मुंबई : या वर्षी दोन वेळा भाडेवाढ करणाऱ्या बेस्ट प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या पासच्या दरामध्येही दुप्पट वाढ केली़ यामुळे पालकांमध्ये प्रचंड रोष पसरला असून ही वाढ कमी करण्यासाठी राजकीय दबाव आणण्यात येत आहेत़ त्यानुसार ही वाढ २० टक्क्यांनी कमी करण्याचा प्रस्ताव बेस्ट समितीच्या बैठकीत उद्या प्रशासन आणणार आहे़या वर्षी फेब्रुवारी आणि एप्रिल अशा दोन्ही महिन्यांत बेस्टने भाडेवाढ केली़ यात पालिका विद्यार्थ्यांच्या सहामाही बसपासचे भाडे दर दहा कि़मी़ साठी ९०० रुपयांवरून थेट १८०० करण्यात आले़ तब्बल दुप्पट भाडे वाढविल्याने पालकांमध्ये रोष पसरला़ त्यामुळे ही वाढ कमी करण्यासाठी भाजपातूनही दबाव वाढू लागला आहे़ त्यानुसार बेस्टने यात कपात करून विद्यार्थ्यांचे सहामाही बसभाडे १५०० रुपये करण्याचा निर्णय घेतला आहे़ तीनशे रुपये ही खूपच किरकोळ कपात असल्याने दर आणखी कमी करून विद्यार्थ्यांना सहामाही पाससाठी १२०० रुपयेच आकारण्यात यावेत, अशी मागणी काँग्रेस सदस्या रवी राजा यांनी केल्याने बेस्ट समितीच्या उद्याच्या बैठकीत वादळी चर्चा होण्याची शक्यता आहे़