खुल्या डबलडेकर बसमधून मुंबईचे 'बेस्ट' दर्शन; दिवाळीपासून पर्यटकांना पर्वणी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2021 08:45 PM2021-11-01T20:45:19+5:302021-11-01T20:46:09+5:30

आतापर्यंत केवळ खासगी कार्यक्रमांसाठी उपलब्ध असलेल्या ओपन डेक बसमधून यापुढे सर्वसामान्य मुंबईकरांना सफर करता येणार आहे.

Best Darshan of Mumbai from open double decker bus for Diwali | खुल्या डबलडेकर बसमधून मुंबईचे 'बेस्ट' दर्शन; दिवाळीपासून पर्यटकांना पर्वणी

खुल्या डबलडेकर बसमधून मुंबईचे 'बेस्ट' दर्शन; दिवाळीपासून पर्यटकांना पर्वणी

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई - आतापर्यंत केवळ खासगी कार्यक्रमांसाठी उपलब्ध असलेल्या ओपन डेक बसमधून यापुढे सर्वसामान्य मुंबईकरांना सफर करता येणार आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर दिनांक ३ नोव्हेंबरपासून ही सेवा बेस्ट उपक्रमामार्फत सुरू करण्यात येणार आहे. त्यानुसार खुल्या डबलडेकर बसमधून अवघ्या ७५ ते दीडशे रुपयांमध्ये नागरिकांना सायंकाळच्या वेळेत मुंबई दर्शन करता येणार आहे. 

मुंबईत अनेक प्रेक्षणीय स्थळे असून प्राचीन वास्तूंची संख्या मोठी आहे. विद्युत रोषणाई केलेली असल्यामुळे या वास्तूंचे दर्शन अत्यंत विलोभनीय असते. त्यामुळे या वास्तूंना भेट देण्याकरिता अनेक पर्यटक उत्सुक असतात. अशा पर्यटकांना पर्यटनाचा आनंद लुटता यावा यासाठी बेस्टने पर्यटन बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार अपर डेकवर प्रति व्यक्ती दीडशे रुपये तर लोअर डेक वर प्रति व्यक्ती ७५ रुपये इतके शुल्क आकारले जाणार आहे.

या प्रेक्षणीय स्थळांना भेट...

गेट वे ऑफ इंडिया, मंत्रालय, म्युझियम, विधान भवन, एन.सी.पी.ए., मरिन ड्राईव्ह, चर्चगेट स्थानक, ओव्हल  मैदान, राजाबाई टोवर, मुंबई उच्च न्यायालय, मुंबई विद्यापीठ, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई महापालिका, हुतात्मा चौक, हॉर्निमल सर्कल, रिजर्व बँक ऑफ इंडिया, एशियाटीक लायब्ररी, जुने कस्टम हाऊस अशा वास्तू व स्थळांचे दर्शन या बसमधून पर्यटकांना घेता येणार आहे.

बस गाड्यांच्या वेळा : गेट वे ऑफ इंडिया येथून - सायंकाळी ६.३०, ७.४५, ८ आणि ९.१५.

तिकिटीचे दर : अपर डेकवर प्रति व्यक्ती - दीडशे रुपये. लोअर डेकवर प्रति व्यक्ती - ७५ रुपये.
 

Web Title: Best Darshan of Mumbai from open double decker bus for Diwali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :BESTबेस्ट