Join us

बेस्टच्या डबल डेकर बसला अपघात

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2019 3:27 AM

बेस्ट बसगाडीला आग लागण्याची घटना ताजी असतानाच सांताक्रुझ पूर्व, वाकोला येथे डबल डेकर बसला अपघात झाला आहे. पश्चिम द्रुतगती मार्गावर वाकोला ब्रिज सर्व्हिस रोडवर ही बस कमानीला धडकली.

मुंबई : बेस्ट बसगाडीला आग लागण्याची घटना ताजी असतानाच सांताक्रुझ पूर्व, वाकोला येथे डबल डेकर बसला अपघात झाला आहे. पश्चिम द्रुतगती मार्गावर वाकोला ब्रिज सर्व्हिस रोडवर ही बस कमानीला धडकली. यामुळे बसच्या टपावरील तीन आसनांच्या जागेचा चक्काचुर झाला. या बसगाडीमध्ये प्रवासी नसल्याने अनर्थ टळला.बेस्ट उपक्रमाची शान असलेली डबल डेकर बस मुंबईत ठरावीक मार्गांवरच चालविण्यात येते. तांत्रिक बिघाड झाल्यामुळे डबल डेकर बस मरोळ आगारातून कुर्ला आगाराकडे बुधवारी मध्यरात्री १ वाजता नेण्यात येत होती. या बसगाडीमध्ये बस चालक आणि मरोळ आगारातील मेकॅनिक विभागातील कर्मचाऱ्याव्यतिरिक्त कोणी नव्हते.मात्र वाकोला पुलाजवळ असलेल्या कमानीला ही बस धडकली. यामुळे बसच्या टपावरील भागाचे मोठे नुकसान झाले आहे. टपावरील पुढील तीन आसनांचेही नुकसान झाले. चालक आनंद विभुते आणि दत्तात्रय सावंत यांना कोणतीही दुखापत झाली नाही. यापूर्वीही३ जुलै २०१८ रोजी सांताक्रुझ उड्डाणपुलाखालून जाताना बसचालकाला त्याचा अंदाज न आल्याने बस रेलिंगवर आदळली होती. त्यानंतरची ही दुसरी घटना आहे.

टॅग्स :अपघातबेस्टमुंबई