बेस्ट इलेक्ट्रिक बसगाड्या आरटीओच्या प्रतीक्षेत
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2019 01:24 AM2019-08-09T01:24:38+5:302019-08-09T01:24:55+5:30
प्रवासी संख्या वाढत असल्याने बसगाड्यांचा ताफाही वाढविण्याचा निर्धार बेस्ट उपक्रमाने केला आहे
मुंबई : प्रवासी संख्या वाढत असल्याने बसगाड्यांचा ताफाही वाढविण्याचा निर्धार बेस्ट उपक्रमाने केला आहे. यासाठी चारशे वातानुकूलित बसगाड्या घेण्याची प्रक्रिया सुरू केल्यानंतर आणखी १२५० मिडी, मिनी व इलेक्ट्रिक बसगाड्या घेण्यात येणार आहेत. यापैकी दहा इलेक्ट्रिक बसगाड्या धारावी बस आगारात दाखल झाल्या आहेत. बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात तीन हजार २०० बसगाड्या आहेत. तर आणखी तीन हजार बसगाड्या वाढविण्यात येणार आहेत.
भाडेतत्त्वावर घेण्यात येणाऱ्या या बसगाड्यांमध्ये वातानुकूलित बसची संख्या अधिक असणार आहे. पर्यावरणाला पोषक इलेक्ट्रिक बसगाड्याही घेण्यात येत आहेत. यापैकी दहा बसगाड्या दाखल झाल्या आहेत. प्रादेशिक वाहतूक कार्यालयाचा हिरवा कंदील मिळाल्यानंतर या बसगाड्या रस्त्यांवरून धावतील, असे बेस्टमधून सांगण्यात आले.