BEST: लवकरच इलेक्ट्रीक डबल डेकर बस ताफ्यात, आदित्य ठाकरेंनी सांगितला 'बेस्ट' प्लॅन
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2022 01:46 PM2022-08-16T13:46:22+5:302022-08-16T13:48:43+5:30
देशाच्या स्वातंत्र्याचे अमृत महोत्वी वर्षे यंदा 2022 मध्ये साजरे करण्यात आले. त्यानिमित्ताने हर घर तिरंगा ही मोहिमही राबविण्यात आली,
मुंबई - राजधानी मुंबई शहराची वाहिनी असलेल्या बससेवेतं आता काळानुसार अमुलाग्र बदल होत आहेत. कधीकाळी मुंबई पाहणे हे म्हणजे ग्रामीण महाराष्ट्रातील जनतेचं स्वप्न असायचं. मुंबईला जाऊन आलो म्हणजे आपण मोठा पराक्रम केला, अशीच गावखेड्यात भावना असायची. मात्र, दळणवळण सुविधा गतीमान झाल्याने, रस्ते महामार्ग निर्माण झाल्याने मुंबई आता प्रत्येकाला जवळची वाटत आहे. याच मुंबईत फिरताना बेस्ट बसचा अनुभव घ्यावाच लागतो. तर, मुंबईकरांची ती जीवनवाहिनी आहे. याच बेस्ट बससंदर्भात माजी मंत्री आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.
देशाच्या स्वातंत्र्याचे अमृत महोत्वी वर्षे यंदा 2022 मध्ये साजरे करण्यात आले. त्यानिमित्ताने हर घर तिरंगा ही मोहिमही राबविण्यात आली, त्यास लोकांचा, संस्थांचा, संघटनांचा उदंड प्रतिसादही पाहायला मिळाला. अनेकांनी 75 व्या अमृत महोत्सवी वर्षांची कलाकृती सादर केली. मुंबईतील बेस्ट बस कार्पोरेशननेही 75 व्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने बेस्ट बसची मांडणीच 75 या आकड्यासारखी केली होती. मुंबई सेंट्रलच्या बेस्ट डेपोत अशी थाटात आणि आगळीवेगळी कलाकृती सादर केली. आदित्य ठाकरे यांनी हा फोटो आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे. तसेच, लवकर डबलडेकर ईव्ही आपण पाहणार आहोत, असेही त्यांनी म्हटलंय.
This is the lifeline of Mumbai.
— Aaditya Thackeray (@AUThackeray) August 16, 2022
Very soon, we will see the Electric Double Decker buses that Uddhav Thackeray ji and I were personally keen on bringing back to our city, in the EV mode. https://t.co/Ek4wvw6ghR
मुंबईचं आकर्षण म्हणजे डबल डेकर बस होय. गतमीनतेच्या काळात डबल डेकर बस मागे पडल्या. एसी आणि आरामदायक बस प्रवाशांना जवळच्या वाटू लागल्या. त्यामुळे, डबल डेकर बस केवळ आठवणीपूरतीच राहिली. शिवाय मुंबईच्या रस्त्यावर या बसची भटकंतीही कमी झाल्याचं दिसून येत आहे. मात्र, आता पुन्हा एकदा डबल डेकर बस पाहायला मिळणार आहेत, तेही एसी. आदित्य ठाकरेंनी आपल्या ट्विटमध्ये यासंदर्भात माहिती दिली. तसेच, उद्धव ठाकरे आणि मी स्वत: याकडे काळजीपूर्वक लक्ष देत आहोत, असेही त्यांनी सांगितलंय.