मुंबई - राजधानी मुंबई शहराची वाहिनी असलेल्या बससेवेतं आता काळानुसार अमुलाग्र बदल होत आहेत. कधीकाळी मुंबई पाहणे हे म्हणजे ग्रामीण महाराष्ट्रातील जनतेचं स्वप्न असायचं. मुंबईला जाऊन आलो म्हणजे आपण मोठा पराक्रम केला, अशीच गावखेड्यात भावना असायची. मात्र, दळणवळण सुविधा गतीमान झाल्याने, रस्ते महामार्ग निर्माण झाल्याने मुंबई आता प्रत्येकाला जवळची वाटत आहे. याच मुंबईत फिरताना बेस्ट बसचा अनुभव घ्यावाच लागतो. तर, मुंबईकरांची ती जीवनवाहिनी आहे. याच बेस्ट बससंदर्भात माजी मंत्री आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.
देशाच्या स्वातंत्र्याचे अमृत महोत्वी वर्षे यंदा 2022 मध्ये साजरे करण्यात आले. त्यानिमित्ताने हर घर तिरंगा ही मोहिमही राबविण्यात आली, त्यास लोकांचा, संस्थांचा, संघटनांचा उदंड प्रतिसादही पाहायला मिळाला. अनेकांनी 75 व्या अमृत महोत्सवी वर्षांची कलाकृती सादर केली. मुंबईतील बेस्ट बस कार्पोरेशननेही 75 व्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने बेस्ट बसची मांडणीच 75 या आकड्यासारखी केली होती. मुंबई सेंट्रलच्या बेस्ट डेपोत अशी थाटात आणि आगळीवेगळी कलाकृती सादर केली. आदित्य ठाकरे यांनी हा फोटो आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे. तसेच, लवकर डबलडेकर ईव्ही आपण पाहणार आहोत, असेही त्यांनी म्हटलंय.