मुंबई : महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना १५ हजार रुपये बोनस जाहीर झाल्यानंतर बेस्ट कर्मचाºयांनाही गुड न्यूज मिळाली आहे. बेस्ट प्रशासनानेही आपल्या कर्मचाºयांना ९,१०० रुपये बोनस शुक्रवारी जाहीर केला. मात्र यामुळे बेस्ट उपक्रमावर ३३ कोटी ३६ लाखांचा आर्थिक भार पडणार आहे.बेस्ट उपक्रम गेली अनेक वर्षे आर्थिक संकटात असल्याने कर्मचाºयांना सानुग्रह अनुदान मिळत नव्हते. गेल्या वर्षी पाच हजार पाचशे रुपये जाहीर करूनही ही रक्कम कर्मचाºयांना देण्यात आली नव्हती. गुरुवारी पालिका कर्मचाºयांना बोनस जाहीर करण्यात आला. बेस्टला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी महापालिकेने आतापर्यंत दोन हजार कोटींहून अधिक रक्कम अनुदान व कर्जस्वरूपात दिली आहे. त्यामुळे बेस्ट आता सावरू लागली आहे.विधानसभेची आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी प्रशासनाने ४१ हजार कर्मचाºयांना बोनस जाहीर केला आहे. बेस्ट कर्मचाºयांना यापूर्वी २०१७ मध्ये ५५०० रुपये बोनस जाहीर करण्यात आलेला होता. मात्र ही रक्कम नंतर पगारामधून दरमहा ५०० रुपये याप्रमाणे कापून घेण्यात आली. आता या वर्षी घोषित करण्यात आलेल्या बोनसच्या रकमेपेक्षा ३,६०० रुपयांनी जास्त आहे. दरम्यान, बेस्ट वर्कर्स युनियनचे शशांक राव यांनी ९ सप्टेंबर रोजी संपाचा इशारा दिला आहे.
बेस्ट कर्मचाऱ्यांना ९,१०० रुपये बोनस जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2019 6:12 AM