बेस्ट विस्तारली, पण आठ बसमार्ग बंद!
By admin | Published: February 1, 2015 02:36 AM2015-02-01T02:36:06+5:302015-02-01T02:36:06+5:30
बेस्ट उपक्रमाच्या बस प्रवर्तनात १ फेब्रुवारीपासून अनेकविध बदल करण्यात येत आहेत. यामध्ये नवीन बसमार्ग, काही बसमार्गांचा विस्तार, काही बसमार्ग बदलण्यात येत आहेत.
दोन नवे बसमार्ग सुरू : अत्यल्प प्रवासी असणारे मार्ग बंद; काही बसमार्ग बदलले
बेस्ट उपक्रमाच्या बस प्रवर्तनात १ फेब्रुवारीपासून अनेकविध बदल करण्यात येत आहेत. यामध्ये नवीन बसमार्ग, काही बसमार्गांचा विस्तार, काही बसमार्ग बदलण्यात येत आहेत. शिवाय ज्या बसमार्गांवर प्रवासी अत्यल्प आहेत; असे आठ बसमार्ग रद्द करण्यात येत आहेत.
नवीन बसमार्ग
वातानुकूलित बसमार्ग क्रमांक ए-८ जलद - हा बसमार्ग बॅकबे आगार आणि हिरानंदानी इस्टेट-ठाणेदरम्यान पूर्व मुक्त मार्गाहून प्रवर्तित करण्यात येईल. एक बसफेरी बॅकबे आगार आणि लोढा पॅरेडाइज (माजिवडा) दरम्यान प्रवर्तित करण्यात येईल.
प्रवासमार्ग
बॅकबे आगार, मंत्रालय, डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी चौक, हुतात्मा चौक, छत्रपती शिवाजी टर्मिनस, मुख्य टपाल कार्यालय, वाडीबंदर, पूर्व मुक्त मार्ग, जिजामाता भोसले मार्ग जंक्शन, वसंतराव नाईक महामार्ग, माजिवडा जंक्शन, घोडबंदर मार्ग, हिरानंदानी इस्टेट (लोढा पॅरेडाइजकरिता प्रवर्तित होणाऱ्या बस फेऱ्यांवरील बसगाड्या माजिवडा येथून लोढा पॅरेडाईजकडे प्रवर्तित होतील.)
प्रस्थानस्थानबसफेऱ्यांच्या वेळा
हिरानंदानी इस्टेट ठाणे८.३० (बॅकबे आगारकरिता)
लोढा पॅरेडाइज ठाणे८.१५ (बॅकबे आगारकरिता)
बॅकबे आगार१८.१५ (हिरानंदानीकरिता)
बॅकबे आगार१७.४५ (लोढा पॅरेडाइजकरिता)
या बसमार्गावरील बसगाड्या सोमवार ते शुक्रवार सकाळी व सायंकाळी प्रत्येकी एक बसफेरीकरिता प्रवर्तित करण्यात येतील.
बसमार्ग क्र. १८० व १८२ यांचे विलीनीकरण : बसमार्ग क्र. १८० राणी लक्ष्मीबाई चौक आणि मालवणी आगार दरम्यान प्रवर्तित करण्यात येत असून बसमार्ग क्र. १८२ वांद्रे (पूर्व) बसस्थानक आणि मालाड आगार दरम्यान प्रवर्तित करण्यात येत आहे. रविवार १ फेब्रुवारीपासून बसमार्ग क्र. १८२ चे प्रवर्तन बसमार्ग क्र. १८० मध्ये विलीन करण्यात येत आहे. या अनुषंगाने बसमार्ग क्र. १८० सकाळी ८ वाजेपर्यंत राणी लक्ष्मीबाई चौक आणि मालवणी आगार दरम्यान प्रवर्तित होईल. सकाळी ८ वाजल्यानंतर काही बसगाड्या मालवणी आगार आणि वांद्रे वसाहत बसस्थानक दरम्यान प्रवर्तित होतील व अन्य बसगाड्या मालाड आगार आणि राणी लक्ष्मीबाई चौक दरम्यान प्रवर्तित करण्यात येतील.
बसमार्गांच्या गंतव्यस्थानात बदल : बसमार्ग क्र. ७२0 मर्या. - भार्इंदर स्थानक (पूर्व) आणि मालाड आगार दरम्यान प्रवर्तित होणाऱ्या या बसमार्गाचे चारकोप मार्केट व मालाड आगार दरम्यानचे महावीरनगर लिंक रोड मार्गे असलेले प्रवर्तन रद्द करून हा बसमार्ग सह्याद्रीनगर, कांदिवली औद्योगिक वसाहत, अस्मिता ज्योती सोसायटी, मालवणी अग्निशमन दल मार्गे मालवणी आगार येथे समाप्त करण्यात येत आहे.
बसप्रवर्तनात बदल : बसमार्ग क्र. ७९ - वांद्रे बसस्थानक (प.) आणि गोराई आगार दरम्यान प्रवर्तित होणाऱ्या या बसमार्गाचे प्रवर्तन सोमवार १ डिसेंबर २0१४ पासून सांताक्रूझ आगार आणि गोराई आगार दरम्यान प्रवर्तित करण्यात येईल.
जलद कॉरीडॉर बसमार्ग क्र.सी-७२ - भार्इंदर स्थानक (पूर्व) आणि राणी लक्ष्मीबाई चौक दरम्यान प्रवर्तित होणाऱ्या या बसमार्गाचे प्रवर्तन राणी लक्ष्मीबाई चौक येथून एव्हरार्डनगर मार्गे आणिक आगारपर्यंत विस्तारित करण्यात येत आहे.
बसमार्ग क्र. दादर फेरी - १ - भरणी नाका आणि दादर स्थानक (पूर्व) दरम्यान प्रवर्तित होणाऱ्या या बसमार्गाचे प्रवर्तन दादर स्थानक (पूर्व) येथून मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय, वडाळा औद्योगिक वसाहत मार्गे वडाळा आगारपर्यंत विस्तारित करण्यात येत आहे.
बसमार्ग क्रमांक ३४८ मर्यादित : दहिसर बसस्थानक आणि राणी लक्ष्मीबाई चौकदरम्यान प्रवर्तित होणाऱ्या या बसमार्गाचे प्रवर्तन राणी लक्ष्मीबाई चौक येथून एव्हरार्ड नगरमार्गे आणिक आगारपर्यंत विस्तारित करण्यात येत आहे. तसेच दुपारी १२ ते सायंकाळी ४ वाजेदरम्यानचे प्रवर्तन दिंडोशी बसस्थानक येथे खंडित करण्यात आले आहे.
बसमार्ग क्रमांक ५०७ मर्यादित : सांताक्रूझ स्थानक पूर्व आणि नेरूळ बसस्थानक दरम्यान प्रवर्तित होणाऱ्या या बसमार्गाचे प्रवर्तन नेरूळ बसस्थानक येथून सीवूड रेल्वेस्थानक उड्डाणपूल मार्गे नेरूळ सेक्टर ४६/४८ पर्यंत विस्तारित करण्यात येत आहे. यापुढे हा बसमार्ग सांताक्रूझ स्थानक (पूर्व) आणि नेरूळ सेक्टर ४६-४८ दरम्यान प्रवर्तित करण्यात येईल.
वातानुकूलित बसमार्ग क्र. एएएस-४६१-जादा- मुलुंड (प.) चेकनाका बसस्थानक आणि गोराई आगार (बोरीवली-प.) दरम्यान प्रवर्तित होणाऱ्या वातानुकूलित बसमार्ग क्रमांक ४६१ वर मजास आगार येथून मुलुंड (प.) चेकनाका बसस्थानक दरम्यान अतिरिक्त बसफेऱ्यांचे प्रवर्तन कार्यान्वित करण्यात येत आहे.
प्रवासमार्ग : मुलुंड (प.) चेकनाका बसस्थानक - पंडित दीनदयाळ उपाध्याय मार्ग - मुलुंड स्थानक (प.) - लाल बहाद्दूर शास्त्री मार्ग - गांधीनगर - पवई - जोगेश्वरी - विक्रोळी जोडमार्ग - सीप्झ गाव ते मजास आगार -
बसमार्ग क्र. दादर फेरी - ३ - दादर स्थानक (प.) आणि श्री सिद्धिविनायक मंदिर दरम्यान प्रवर्तित होणाऱ्या या बसमार्गाचे प्रवर्तन श्री सिद्धिविनायक मंदिर येथून कॉ. प्र.कृ. कुरणे चौक (बी.डी.डी. चाळ) पर्यंत विस्तारित करण्यात येत आहे. हा बसमार्ग सोमवार ते शनिवार सकाळी व सायंकाळी गर्दीच्या वेळी प्रवर्तित होईल.
बसमार्ग क्र. ५0९ मर्या. : प्रतीक्षानगर आगार आणि मिलेनिअम बिझनेस पार्क दरम्यान प्रवर्तित होणाऱ्या या बसमार्गाचे प्रतीक्षानगर आगार आणि घाटकोपर आगार दरम्यानचे प्रवर्तन रद्द करून हा बसमार्ग घाटकोपर आगार येथून प्रवर्तित करण्यात येईल. तसेच मिलेनिअम बिझनेस पार्कचा वळसा रद्द करून हा बसमार्ग महापे येथून ठाणे-बेलापूर मार्ग, पावणे उड्डाणपूल मार्गे एपीएमसी सेक्टर-१९ पर्यंत विस्तारित करण्यात येत आहे. यापुढे हा बसमार्ग घाटकोपर आगार आणि एपीएमसी सेक्टर १९ दरम्यान प्रवर्तित करण्यात येईल.
बसमार्ग क्र. ३८ : वांद्रे बसस्थानक (प.) आणि मालाड आगार दरम्यान प्रवर्तित होणाऱ्या या बसमार्गाचे प्रवर्तन अत्यल्प प्रवासी प्रतिसादामुळे रद्द करण्यात येत आहे.
बसमार्ग क्र. ९१ मर्या. : मुंबई सेंट्रल आगार आणि लोकमान्य टिळक टर्मिनस दरम्यान प्रवर्तित होणाऱ्या या बसमार्गाचे प्रवर्तन अत्यल्प प्रवासी प्रतिसादामुळे रद्द करण्यात येत आहे.
बसमार्ग क्र. ४१४ मर्या. - मुंबई सेंट्रल आगार आणि मजास आगार दरम्यान प्रवर्तित होणाऱ्या या बसमार्गाचे प्रवर्तन अत्यल्प प्रवासी प्रतिसादामुळे तसेच अन्य पर्यायी सेवा उपलब्ध असल्याने रद्द करण्यात येत आहे.
बसमार्ग क्र. ४८३ : डॉ. आंबेडकर उद्यान (चेंबूर) आणि टागोरनगर क्र. ५ दरम्यान प्रवर्तित होणाऱ्या या बसमार्गांचे प्रवर्तन अत्यल्प प्रतिसादामुळे रद्द करण्यात येत आहे.
बसमार्ग क्र. ५२० मर्या. : देवनार आगार आणि ऐरोली बसस्थानक दरम्यान प्रवर्तित होणाऱ्या या बसमार्गाचे प्रवर्तन असमाधानकारक प्रवासी प्रतिसाद तसेच अन्य पर्यायी सेवा उपलब्ध असल्याने रद्द करण्यात येत आहे.
बसमार्ग क्र. ६१७ : आर.सी.एफ. वसाहत भांडुप (पूर्व) आणि खिंडीपाडा दरम्यान प्रवर्तित होणाऱ्या या बसमार्गाचे प्रवर्तन अत्यल्प प्रवासी प्रतिसादामुळे रद्द करण्यात येत आहे.
वातानुकूलित बसमार्ग क्र. एएस ५०३ - वडाळा आगार आणि कळंबोली बसस्थानक दरम्यान प्रवर्तित होणाऱ्या या बसमार्गाचे प्रवर्तन समाधानकारक प्रवासी आणि प्रतिसादाअभावी तसेच उपलब्ध पर्यायी बससेवांमुळे रद्द करण्यात येत आहे.
रविवारचे प्रवर्तन रद्द
बसमार्ग क्र. ४४० मर्या. - वडाळा आगार आणि बोरीवली स्थानक (पूर्व) दरम्यान अन्य समांतर बसमार्ग उपलब्ध असल्यामुळे रविवार रोजी या बसमार्गाला असलेला असमाधानकारक प्रवासी प्रतिसाद विचारात घेऊन रविवारचे या बसमार्गाचे प्रवर्तन रद्द करण्यात येत आहे.
बसमार्ग क्र. ३७४ मर्या. : अणुशक्तीनगर आणि गोरेगाव बसस्थानक (प.) दरम्यान प्रवर्तित होणाऱ्या या बसमार्गाचे शिवाजी चौक-अंधेरी (पूर्व) येथून गोरेगाव बसस्थानक (प.) दरम्यानचे प्रवर्तन रद्द करून नित्यानंद मार्गावरून हा बसमार्ग आगरकर चौक येथे समाप्त होईल. यापुढे हा बसमार्ग अणुशक्तीनगर आणि आगरकर चौक दरम्यान प्रवर्तित होईल.
बसमार्ग क्र. ५०२ मर्या. : राणी लक्ष्मीबाई चौक आणि नेरूळ सेक्टर ४६/४८ दरम्यान प्रवर्तित होणाऱ्या या बसमार्गाचे राणी लक्ष्मीबाई चौक येथून वसंतराव नाईक महामार्ग, अमर महल, जिजामाता भोसले मार्गावरून महाराष्ट्र नगर (मानखुर्द) पर्यंतचे प्रवर्तन रद्द करून यापुढे हा बसमार्ग देवनार आगार येथून मानखुर्द मार्गे कार्यान्वित करण्यात येईल. तसेच या बसमार्गावर वाशी बसस्थानक आणि नेरूळ सेक्टर ४६/४८ दरम्यान काही अतिरिक्त बसफेऱ्यादेखील प्रवर्तित करण्यात येतील.
बसमार्ग क्र. ५०६ मर्या. : जिजामाता उद्यान आणि नेरूळ बसस्थानक दरम्यान प्रवर्तित होणाऱ्या या बसमार्गाचे सोमवार ते शनिवार आणि सार्वजनिक सुटी दिवशी दुपारचे प्रवर्तन स्थगित करण्यात येत आहे. तसेच रविवारी संपूर्ण दिवस हा बसमार्ग जिजामाता उद्यान येथून कार्यान्वित राहील.
बसमार्ग क्र. ६६१ : मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानक येथून महालक्ष्मी रेल्वे स्थानक , वरळी नाका, नेहरू तारांगण, हाजीअली, वसंतराव नाईक चौक मार्गे वर्तुळाकार सेवेत प्रवर्तित होणाऱ्या या बसमार्गाचे प्रवर्तन फक्त सकाळी व सायंकाळी गर्दीच्या वेळी कार्यान्वित ठेवण्यात येईल.