बेस्टने आतापर्यंत फेडले ५३१ कोटी रुपयांचे कर्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2019 12:40 AM2019-08-23T00:40:00+5:302019-08-23T00:40:12+5:30

बेस्ट उपक्रमावर असणा-या कर्जाच्या परतफेडीकरिता मुंबई महानगरपालिकेकडून १ हजार १३६.३१ कोटी रुपये इतकी रक्कम मंजूर करण्यात आली आहे.

 Best has repaid a loan of Rs 1 crore so far | बेस्टने आतापर्यंत फेडले ५३१ कोटी रुपयांचे कर्ज

बेस्टने आतापर्यंत फेडले ५३१ कोटी रुपयांचे कर्ज

Next

मुंबई : बेस्टचे तिकीट ५ रुपये करून मुंबईकरांना दिलासा देणाऱ्या बेस्टचे मात्र कर्जाच्या ओझ्याने कंबरडे मोडले आहे. सातत्याने तोट्यात असलेल्या बेस्टकडे कर्मचारी वर्गाचे पगार देण्यासह पुरेसे पैसे नसल्याने बेस्ट मेटाकुटीला आहे. परंतु आता महापालिकेने बेस्टला मदत केल्याने बेस्टने आतापर्यंत ५३१ कोटी रुपये एवढ्या कर्जाची परतफेड केली आहे.
बेस्ट उपक्रमावर असणा-या कर्जाच्या परतफेडीकरिता मुंबई महानगरपालिकेकडून १ हजार १३६.३१ कोटी रुपये इतकी रक्कम मंजूर करण्यात आली आहे. मंजूर रकमेपैकी आतापर्यंत मुंबई महानगरपालिकेने ६६५.३१ कोटी रुपये बेस्ट उपक्रमाला दिले आहेत. त्यामधून आजपर्यंत ५३१.५५ कोटी रुपये एवढ्या कर्जाची त्वरित परतफेड करण्यात आली आहे. परिणामी बेस्ट उपक्रमावरील कर्जाचा भार ५३१.५५ कोटी रुपयांनी कमी झाला आहे. बेस्ट उपक्रमाला कर्जावरील व्याजापोटी द्याव्या लागणाºया वार्षिक ५२.६३ कोटी रुपये रकमेची बचत झाली आहे.

Web Title:  Best has repaid a loan of Rs 1 crore so far

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :BESTबेस्ट