प्रवासी वाढविण्यासाठी बेस्टचे ‘थेट-भेट’ अभियान!
By admin | Published: July 2, 2015 04:21 AM2015-07-02T04:21:51+5:302015-07-02T04:21:51+5:30
बेस्ट उपक्रमाने बेस्टचे उत्पन्न वाढविण्यासह प्रवाशांची संख्या वाढविण्यासाठी आता थेट-भेट अभियान सुरू केले आहे. या अभियानांतर्गत आगार व्यवस्थापक, वरिष्ठ अधिकारी
मुंबई : बेस्ट उपक्रमाने बेस्टचे उत्पन्न वाढविण्यासह प्रवाशांची संख्या वाढविण्यासाठी आता थेट-भेट अभियान सुरू केले आहे. या अभियानांतर्गत आगार व्यवस्थापक, वरिष्ठ अधिकारी प्रत्येक रविवारी सकाळी ११ वाजता प्रवाशांशी थेट संपर्क साधून सेवेसंबंधीच्या अडचणी आणि सूचनांची नोंद घेणार आहेत. या अभियानास हजर राहून सूचना व अडचणी व्यवस्थापनाच्या निदर्शनास आणून द्याव्यात, असे आवाहन बेस्टने केले आहे.
प्रवासी थेट-भेट अभियानाची रूपरेषा
दिनांकविभागबस आगार
५ जुलैशहरकुलाबा, बॅकबे, मुंबई सेंट्रल, वरळी, वडाळा, वांद्रे
१२ जुलैमध्य उपनगरधारावी, कुर्ला, मरोळ, मजास, दिंडोशी, मागाठाणे
१९ जुलैपश्चिम उपनगरसांताक्रूझ, गोरेगाव, ओशिवरा, पोयसर, मालाड, मालवणी, गोराई
२६ जुलैपूर्व उपनगरआणिक, प्रतीक्षा नगर, देवनार, शिवाजी नगर, विक्रोळी, घाटकोपर, मुलुंड