Join us

बेस्टचा संप टळला

By admin | Published: October 27, 2015 1:44 AM

बेस्ट प्रशासन आणि कामगार संघटनांमध्ये बोनसवरून सुरू असलेल्या चर्चेतून ३ नोव्हेंबर रोजी अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे

मुंबई : बेस्ट प्रशासन आणि कामगार संघटनांमध्ये बोनसवरून सुरू असलेल्या चर्चेतून ३ नोव्हेंबर रोजी अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. त्यामुळे २६ आॅक्टोबरच्या रात्रीपासूनचा संप टळला आहे. पुढील आठवड्यात तरी दिवाळीचा बोनस मिळतो की नाही, याकडे बेस्टच्या कामगारांचे डोळे लागले आहेत.मुंबई महापालिकेने आपल्या कर्मचाऱ्यांना तब्बल १३ हजार ५०० दिवाळी बोनस जाहीर केला आहे. बेस्टदेखील महापालिकेचाच एक उपक्रम आहे. मग असे असताना बोनस देण्याबाबत एवढा भेदभाव का, असा खोचक सवाल संघटनांनी केला आहे. महत्त्वाचे म्हणजे बेस्ट प्रशासनाने २०१४-१५ च्या अर्थसंकल्पात बोनससाठी ३५ कोटींची तरतूद केली आहे. बोनसची तरतूद करूनही बेस्टला २०१४-१५ साली ६७ कोटी निव्वळ नफा झाला आहे. परिणामी, प्रशासनाने बोनस दिवाळीपूर्वीच जाहीर करणे गरजेचे आहे, असे ‘बॉम्बे इलेक्ट्रिक वर्कर्स युनियन’, ‘बेस्ट कामगार क्रांती संघा’तर्फे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)