मुंबई उपनगरातील बेस्टच्या मिनी बस बंद, प्रवाशांचे होताहेत प्रचंड हाल!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2024 06:22 PM2024-10-25T18:22:17+5:302024-10-25T18:25:46+5:30

मुंबईच्या अरुंद रस्त्यांवरुन कोंडी होणाऱ्या मार्गांवर बेस्ट बस अडकून पडू नयेत यासाठी काही वर्षांपूर्वी बेस्ट प्रशासनाने वातानुकूलित मिडी-मिनी बस ताफ्यात दाखल केल्या होत्या.

BEST mini buses in Mumbai suburbs are closed passengers are facing a lot of trouble | मुंबई उपनगरातील बेस्टच्या मिनी बस बंद, प्रवाशांचे होताहेत प्रचंड हाल!

मुंबई उपनगरातील बेस्टच्या मिनी बस बंद, प्रवाशांचे होताहेत प्रचंड हाल!

मुंबई

मुंबईच्या अरुंद रस्त्यांवरुन कोंडी होणाऱ्या मार्गांवर बेस्ट बस अडकून पडू नयेत यासाठी काही वर्षांपूर्वी बेस्ट प्रशासनाने वातानुकूलित मिडी-मिनी बस ताफ्यात दाखल केल्या होत्या. परंतु मिनी बस काही दिवसांपासून बंद आहेत. आर्थिक अडचणींचे कारण पुढे करत हंसा या मिनी बसचा पुरवठा करण्यास असमर्थता दर्शवली आहे. जवळपास २० दिवसांपासून या बसेस बंद असल्यामुळे पश्चिम उपनगरांतील प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. 

बेस्टच्या ताफ्यात भाडेतत्वावरील २८० वातानुकूलित मिनी बस धावत होत्या. त्या मरोळ, दिंडोशी, ओशिवरा आगारामार्फत पश्चिम उपनगरात चालवण्यात येत होत्या. मात्र, कंत्राटदाराने १२ ऑक्टोबरपासून त्यांचा पुरवठा बंद केला. आर्थिक अडचणींमुळे या बसची सेवा देऊ शकत नसल्याचे कंत्राटदाराने बेस्ट उपक्रमाला कळविले. कंत्राटदाराच्या माघारीमुळे पश्चिम उपनगरातील नऊ टक्के बस ताफ्यातून कमी झाल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांना बसची वाट पाहत तिष्ठावे लागत आहे. 

बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात सध्या ३,१९६ बसगाड्या आहेत. त्यात एसी डबल डेकर, सिंगल डेकर, तसेच नॉन एसी सिंगल डेकर बसचा समावेश आहे. २८ आसनी मिडी बसही आहेत. त्यामध्ये काही बस भाडेतत्त्वावर चालविण्यात येतात. मिनी बसनाही प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत होता. 

कंत्राटदारांवर कारवाई?
यासंदर्भात बुधवारी बेस्ट उपक्रमाच्या बैठकीत कंत्राटदाराने पुन्हा माघार घेतल्याने आता बेस्टने कंत्राट रद्द करण्याची कार्यवाही सुरु केली आहे. मात्र मिनी बसचा पुरवठा बंद करुन बेस्ट प्रवाशांचे हाल करणाऱ्या कंत्राटदारावर काय कारवाई करणार, असा प्रश्न बेस्ट कामगार संघटनांनी उपस्थित केला आहे.

प्रवाशांसाठी पर्यायी सुविधा काय?
- उपनगरांताली मिनी बससेवा बंद करण्यात आल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. त्यामुळे बेस्ट उपक्रम कोणती पर्यायी व्यवस्था करणार आहे. असा सवाल बेस्ट संघटना उपस्थित करत आहेत. 
- याशिवाय डिसेंबर २०२४ अखेरीस बेस्टच्या स्वमालकीच्या बसची संख्या आयुष्यमान संपल्यामुळे १०४७ वरुन ५०० वर येणार आहे. त्यामुळे बेस्टने स्वमालकीचा बस ताफा ३३३७ पर्यंत राखावा यासाठी पालिकेने निधी द्यावा अशी मागणी बेस्ट कामगार सेनेने केली आहे.

Web Title: BEST mini buses in Mumbai suburbs are closed passengers are facing a lot of trouble

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.