Join us

बेस्ट संग्रहालयाचा ‘अनुभूती’ रेल्वे कोच

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2019 2:37 AM

आणिक आगारमध्ये बेस्ट प्रशासनाचे संग्रहालय आहे. या संग्रहालयात बेस्टच्या जुन्या आठवणी जतन करून ठेवण्यात आल्या आहेत.

मुंबई -  आणिक आगारमध्ये बेस्ट प्रशासनाचे संग्रहालय आहे. या संग्रहालयात बेस्टच्या जुन्या आठवणी जतन करून ठेवण्यात आल्या आहेत. संग्रहालयाचे कामकाज सहायक कार्यादेशक यतीन पिंपळे पाहतात. यतीन पिंपळे यांनी कागदी बसगाड्या आणि रेल्वेचे कोच तयार करण्याचा छंद आहे. पिंपळे यांनी आता वातानुकूलित मुंबई-अहमदाबाद शताब्दी एक्स्प्रेसचा कागदी ‘अनुभूती’ कोच बनविला आहे. सोमवारी पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर यांच्याकडे कोच सुपुर्द करण्यात आला आहे.रेल्वेच्या प्रदर्शनासाठी कागदी कोचचा उपयोग होतो. नागरिकांना प्रत्यक्षात कोच दाखविणे शक्य नसल्यामुळे या कोचद्वारे नागरिकांना माहिती दिली जाते. मागील महिन्यामध्ये रेल्वेसाठी विस्टाडोम हा कोच बनविला होता. त्यावेळी पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी तो पाहिला आणि त्यांनीही आपल्यासाठी मुंबई-अहमदाबाद शताब्दी एक्स्प्रेसचा ‘अनुभूती’ कोच बनविण्यासाठी सांगितले होते. त्यामुळे हा कोच बनविण्यात आला. ‘अनुभूती’हा कोच कागदापासून तयारकेला आहे.एलईडीचा वापर करून त्या कोचमध्ये अंतर्गत सजावट करण्यात आली आहे. मूळ कोचच्या ६० पट लहान असून २८ आसने आहेत. कोचमध्ये विमानासारख्या सोयी देण्यात आल्या आहेत. प्रथम श्रेणीचा कोच आहे. मोबाइल चार्जिंगसाठी स्वतंत्र सोय दिलेली आहे.आरामदायी आसन व्यवस्था, प्रत्येक आसनासोबत टीव्ही, पब्लिक इन्फॉर्मेशन सिस्टीम, सीसीटीव्ही कॅमेरे, चांगल्या दर्जाचे शौचालय इत्यादी सुख-सुविधा उपलब्ध आहेत, अशी माहिती बेस्ट संग्रहालयाचे सहायक कार्यादेशक यतीन पिंपळे यांनीदिली. 

टॅग्स :बेस्टमुंबई