मुंबईकरांच्या जाणून घेणार ‘बेस्ट’सूचना

By Admin | Published: April 26, 2017 12:40 AM2017-04-26T00:40:35+5:302017-04-26T00:40:35+5:30

प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी बेस्ट प्रशासनाकडून जे.जे. स्कूल आॅफ आर्टच्या साहाय्याने बसची रंगसंगती बदलण्यात येत आहे.

'Best' notification for Mumbaikars | मुंबईकरांच्या जाणून घेणार ‘बेस्ट’सूचना

मुंबईकरांच्या जाणून घेणार ‘बेस्ट’सूचना

googlenewsNext

मुंबई : प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी बेस्ट प्रशासनाकडून जे.जे. स्कूल आॅफ आर्टच्या साहाय्याने बसची रंगसंगती बदलण्यात येत आहे. त्यासाठी सफेद रंग बसना देण्यात येत असून, प्रथम दोन बस तयार केल्या जात आहेत. सफेद रंगाच्या बस प्रवाशांच्या कितपत पसंतीस पडतील याची शाश्वती नसल्याने आणि लाल रंगाच्या बस म्हणजे ‘बेस्ट’अशी मानसिकता असल्याने जे.जे. स्कूल आॅफ आर्टकडून त्याबाबत सर्व्हे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दोनपैकी एका बसच्या रंगसंगतीवर काम सुरू असून, लवकरच या बस ताफ्यात दाखल होताच मुंबईकरांच्या प्रतिक्रिया आणि सूचना या सर्वेक्षणातून जाणून घेतल्या जातील, असे जे.जे.तर्फे सांगण्यात आले.
बेस्टच्या मुंबईत सध्याच्या घडीला ३,८०० बसेस धावत असून, यामध्ये १२० डबल डेकर बस आहेत. या बस लाल रंगाच्या असून, ताफ्यात असलेल्या २६६ एसी बसेसचा रंग हा जांभळा आहे. वर्षानुवर्षे लाल रंगाच्या बस मुंबईतून धावत असतानाच आता या बसची रंगसंगती बदलण्यावर बेस्टकडून काम केले जात आहे. त्याबाबतचे काम जे.जे. स्कूल आॅफ आर्टला देण्यात आले आहे.
प्रायोगिक तत्त्वावर दोन बसना सफेद रंग देण्यात येत असून, यातील एका बसचे काम पूर्ण करण्यात आले आहे. यासंदर्भात जे.जे. स्कूल आॅफ आर्ट्सचे (अप्लाईड आर्ट) अधिष्ठाता संतोष क्षीरसागर यांनी सांगितले की, वर्षानुवर्षे लाल रंगाच्या बेस्ट
बसेस मुंबईकरांच्या मनात घर करून आहेत.
त्यामुळे सफेद रंगाच्या बस प्रवाशांच्या पसंतीस पटकन उतरणे शक्य नाही. हे पाहता सफेद रंगाच्या बस प्रवाशांना पसंत आहेत का, यासाठी सर्व्हे करण्यात येणार आहे. हा सर्व्हे करताना प्रवाशांचे मत जाणून घेतले जाणार आहे. त्यानंतर ही बस प्रवाशांना पसंत आहे की नाही आणि त्यानुसार बसचा रंग बदलणे योग्य आहे का याचा निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: 'Best' notification for Mumbaikars

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.