वीज पुरवठ्यात बेस्ट’ नंबर वन
By सीमा महांगडे | Updated: February 14, 2024 19:05 IST2024-02-14T19:04:14+5:302024-02-14T19:05:15+5:30
मुंबई - स्वस्त आणि अखंडित वीजपुरवठा करणारी कंपनी म्हणून बेस्ट उपक्रमाच्या विद्युत विभागाला सन्मानित करण्यात आले आहे. केंद्रीय विद्युत ...

वीज पुरवठ्यात बेस्ट’ नंबर वन
मुंबई - स्वस्त आणि अखंडित वीजपुरवठा करणारी कंपनी म्हणून बेस्ट उपक्रमाच्या विद्युत विभागाला सन्मानित करण्यात आले आहे. केंद्रीय विद्युत प्राधिकरणाच्या अध्यक्ष घनश्याम प्रसाद यांच्या हस्ते आयपीपीए पुरस्कार २०२४ सोहळ्यात बेस्ट उपक्रमाला ‘उत्कृष्ट योगदान’साठी गौरविण्यात आले.
इंडिपेंडेंट पॉवर प्रोड्युसर्स असोसिएशन ऑफ इंडियातर्फे गेल्या आठवड्यात बेळगाव, कर्नाटक येथे २४ व्या रेग्युलेटर पॉलिसी मेकर्स रिट्रीटमध्ये पुरस्कार सोहळा पार पडला. बेस्ट उपक्रमाचे उत्कृष्ट नेतृत्व व स्वच्छ ऊर्जा आणि शाश्वत कार्यपद्धतींना चालना देण्यासाठी उचललेली पावले व ऊर्जा क्षेत्रातील अतूट बांधिलकी व्यापकपणे ओळखली गेली, तसेच बेस्टची प्रशंसाही केली गेली आहे. सीईआयसीचे माजी अध्यक्ष प्रमोद देव यांच्या हस्ते पारितोषिक तर केंद्रीय विद्युत प्राधिकरणाचे अध्यक्ष घनश्याम प्रसाद तसेच सचिव भारत सरकार यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन इतर अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत गौरविण्यात आले.