‘बेस्ट’ प्रवाशांनी खच्चून भरली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2020 02:05 AM2020-06-10T02:05:09+5:302020-06-10T02:05:17+5:30

मुंबईच्या बसगाड्यांमधून दररोज सरासरी ३२ लाख प्रवासी प्रवास करीत असतात. लॉकडाऊनच्या काळातही अत्यावश्यक सेवांसाठी बसगाड्या सुरू ठेवण्यात आल्या होत्या.

The ‘best’ passengers were overwhelmed | ‘बेस्ट’ प्रवाशांनी खच्चून भरली

‘बेस्ट’ प्रवाशांनी खच्चून भरली

Next

मुंबई : पुन:श्च हरिओमच्या दुसऱ्या दिवशीही बसथांब्यावर लांबच्या लांब रांगा आणि प्रवाशांनी खच्चून भरलेल्या बसगाड्या हेच चित्र दिसून आले. सोमवारी बेस्ट बसगाड्यांमधून तब्बल चार लाख मुंबईकरांनी प्रवास केला. मात्र मागणीनुसार बसगाड्यांची संख्या वाढविण्याऐवजी मंगळवारी आदल्या दिवशीच्या तुलनेत कमी बसगाड्या धावल्या. यामुळे पुन्हा सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला. 

मुंबईच्या बसगाड्यांमधून दररोज सरासरी ३२ लाख प्रवासी प्रवास करीत असतात. लॉकडाऊनच्या काळातही अत्यावश्यक सेवांसाठी बसगाड्या सुरू ठेवण्यात आल्या होत्या. सोमवारपासून खासगी कार्यालये कर्मचाऱ्यांच्या मर्यादित संख्येने सुरू करण्यात आली. मात्र लोकल सेवा बंद असल्याने सर्व प्रवाशी बसगाड्यांकडे धावले. परंतु, या गर्दीचा अंदाज घेऊन बसगाड्यांचे नियोजन करण्यात बेस्ट उपक्रमाचे गणित फसले. त्यामुळे सलग दुसºया दिवशी मुंबईत बसगाड्या कोणतेही नियम न पाळता प्रवाशांच्या गर्दी भरलेल्या दिसून आल्या. बेस्ट उपक्रमाने सोमवारी २४८१ बसगाड्या आगाराबाहेर काढल्या होत्या. त्यातून चार लाख १९ हजार १५३ प्रवाशांनी प्रवास केला होता. प्रवाशांकडून मागणी अधिक असल्याने बेस्ट उपक्रमाने गाड्यांची संख्या मंगळवारी वाढविणे अपेक्षित होते. मात्र बेस्ट उपक्रमाच्या जनसंपर्क विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार २३०८ बसगाड्या चालविण्यात आल्या. यामुळे मुंबईकरांची आणखी गैरसोय होताना दिसून आली. बेस्टमधील कोरोनाबाधित कर्मचाºयांची संख्या अधिक असल्याने उपस्थिती कमी असल्याचा परिणाम बससेवेवर होत असल्याचे सूत्रांकडून समजते.

लोकल सेवा बंद असल्याने सर्व प्रवासी बसगाड्यांकडे धावले. परंतु, या गर्दीचा अंदाज घेऊन बसगाड्यांचे नियोजन करण्यात बेस्ट उपक्रमाचे गणित फसले. बस गर्दीने भरलेल्या दिसून आल्या.

Web Title: The ‘best’ passengers were overwhelmed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.