वायुप्रदूषण टाळण्यासाठी ‘बेस्ट’- महापौर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2019 02:49 AM2019-12-09T02:49:10+5:302019-12-09T06:08:53+5:30

मुंबईच्या महापौरपदी किशोरी पेडणेकर यांची नियुक्ती झाली असतानाच त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला होता.

'Best' prevent air pollution- mayor | वायुप्रदूषण टाळण्यासाठी ‘बेस्ट’- महापौर

वायुप्रदूषण टाळण्यासाठी ‘बेस्ट’- महापौर

googlenewsNext

मुंबई : मुंबईच्यामहापौरपदी किशोरी पेडणेकर यांची नियुक्ती झाली असतानाच त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला होता. तेव्हा किशोरी पेडणेकर म्हणाल्या होत्या की, वायुप्रदूषण टाळण्याकरिता सार्वजनिक वाहतूक उपक्रम असलेला बेस्ट बसचा प्रवास नागरिकांनी करावा, यासाठी प्राधान्याने लक्ष घालणार आहे.

खड्डेमुक्त रस्ते करण्यासाठी महापालिकेने जप्त केलेल्या प्लास्टीकचा वापर करून प्लास्टीक प्रणालीचे रस्ते बांधणार. प्लास्टीकमुक्त अभियानामध्ये नागरिकांचा अधिकाअधिक सहभाग वाढविण्यासाठी प्रयत्न करणार. शून्य कचरा मोहीम प्रत्येक प्रशासकीय विभागासाठी नियोजनबद्धरीत्या राबविण्यात येणार. कांदळवन संवर्धनासाठी विशेष प्रयत्न करणार.

दरम्यान, महापौरांनी दिलेली आश्वासने त्या किती पाळतात? याकडे मुंबईकरांचेही लक्ष असणार आहे. कारण मुंबईतील प्रदूषणही दिवसागणिक वाढत असून, ते कमी करण्यासाठी प्रशासकीय प्रयत्न व्हावेत, असे म्हणणे मुंबईकरांनी वारंवार मांडले आहे.

Web Title: 'Best' prevent air pollution- mayor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.