Join us  

हिंद मजदूर किसान पंचायतचे ‘बेस्ट बचाव’ अभियान

By admin | Published: April 11, 2017 1:43 AM

हिंद मजदूर किसान पंचायत आणि बेस्ट वर्कर्स वेल्फेअर ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने ‘बेस्ट बचाव’ अभियानाची घोषणा करण्यात आली आहे. याअंतर्गत

मुंबई : हिंद मजदूर किसान पंचायत आणि बेस्ट वर्कर्स वेल्फेअर ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने ‘बेस्ट बचाव’ अभियानाची घोषणा करण्यात आली आहे. याअंतर्गत विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांचा सल्ला घेऊन बेस्टला आर्थिक अचडणीतून बाहेर काढणारा आराखडा तयार केला जाईल. तो बेस्ट प्रशासनाला सादर करून त्याची अंमलबजावणी होतेय का? याचा पाठपुरावा दोन्ही संघटना करतील. पंचायतचे राष्ट्रीय सरचिटणीस सुभाष मळगी म्हणाले की, येत्या १५ दिवसांत वाहतूक, अभियांत्रिकी, अर्थ आदी विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ आणि बेस्ट उपक्रमासंदर्भातील जाणकारांची समिती गठीत करून आराखडा तयार होईल. बेस्ट कर्मचारी, अधिकारी वर्गासाठी सभांचे आयोजन होईल. तर बेस्टसाठी शासकीय धोरण जाहीर होऊन ठोस कृती होत नाही, तोपर्यंत पाठपुरावा सुरू राहील, असे ट्रस्टचे व्यवस्थापकीय विश्वस्त उदयकुमार आंबोणकर म्हणाले. (प्रतिनिधी)