मुंबई मॅरेथॉनसाठी बेस्टच्या मार्गात बदल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2024 10:16 AM2024-01-20T10:16:42+5:302024-01-20T10:17:55+5:30

या पार्श्वभूमीवर मुंबई वाहतूक पोलिसांतर्फे या मार्गावर वाहतुकीवर निर्बंध लावण्यात येणार आहेत.

BEST route changes for mumbai marathon read about this all details | मुंबई मॅरेथॉनसाठी बेस्टच्या मार्गात बदल

मुंबई मॅरेथॉनसाठी बेस्टच्या मार्गात बदल

मुंबई : रविवारी मुंबईमध्ये सकाळी ०५:१५ वा. ते दुपारी १३:३० या वेळेत मुंबई मॅरेथॉन स्पर्धा- २०२४ होणार आहे. या स्पर्धेचा मुख्य मार्ग हा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-हुतात्मा चौक चर्चगेट-मरिन ड्राईव्ह-पेडर रोड- हाजी अली-वांद्रे वरळी सागरी सेतू मार्ग-माहिम-प्रभादेवी-हाजी अली ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असा राहणार आहे. 

 या पार्श्वभूमीवर मुंबई वाहतूक पोलिसांतर्फे या मार्गावर वाहतुकीवर निर्बंध लावण्यात येणार आहेत.

 त्यामुळे या मार्गावरून सुरू असणारे बसमार्ग हे सायन - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग - जे. जे. रुग्णालय-वाडी बंदर-पीडीमेलो रोड मार्गे तसेच सायन येथून माहिम-सेनापती बापट मार्ग - डॉ. ई. मोझेस मार्ग-महालक्ष्मी स्थानक-सात रस्ता मार्गावरून वळविण्यात आली. 

Web Title: BEST route changes for mumbai marathon read about this all details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.