टाटा 'मुंबई मॅरेथॉन २०२४' करिता बेस्ट मार्गात बदल 

By सीमा महांगडे | Published: January 19, 2024 07:13 PM2024-01-19T19:13:26+5:302024-01-19T19:15:02+5:30

या पार्श्वभूमीवर मुंबई वाहतूक पोलीसांतर्फे या मार्गावर वाहतुकीवर निर्बंध लावण्यात येणार आहेत.

Best route changes for Tata 'Mumbai Marathon 2024' | टाटा 'मुंबई मॅरेथॉन २०२४' करिता बेस्ट मार्गात बदल 

टाटा 'मुंबई मॅरेथॉन २०२४' करिता बेस्ट मार्गात बदल 

मुंबई: येत्या रविवारी मुंबईमध्ये सकाळी ०५.१५ वा. ते दुपारी १३.३० वा. टाटा मुंबई मॅरेथॉन स्पर्धा- २०२४पर्यंत आयोजि करण्यात आली आहे. या स्पर्धेचा मुख्य मार्ग हा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-हुतात्माचौक चर्चगेट-मरिन ड्राईव्ह-पेडर रोड- हाजी अली-वांद्रे वरळी सागरी सेतु मार्ग-माहिम-प्रभादेवी-हाजी अली ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असा राहणार आहे. 

या पार्श्वभूमीवर मुंबई वाहतूक पोलीसांतर्फे या मार्गावर वाहतुकीवर निर्बंध लावण्यात येणार आहेत. त्यामुळे या मार्गावरून सुरु असणारे बसमार्ग हे सायन-डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग-जे.जे. रूग्णालय-वाडी बंदर-पीडीमेलो रोड मार्गे तसेच सायन येथून माहिम-सेनापती बापट मार्ग - डॉ. ई. मोझेस मार्ग-महालक्ष्मी स्थानक-सात रस्ता मार्गावरून वळविण्यात आल्याची माहिती बेस्ट उपक्रमाकडून देण्यात आली आहे. तसेच बसमार्ग क्र. ए-१००, ए-१०५, ए-१०६,ए-१०८, ए-११२, ए-११३, ए-१२३, १५५ या बसमार्गाचे ये जा या स्पर्धा दरम्यानच्या काळात तात्पुरते स्थगित करण्यात येणार आहे.

Web Title: Best route changes for Tata 'Mumbai Marathon 2024'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.