Join us

बेस्टचा मार्ग भविष्यातही खडतर; सलग तिसऱ्या वर्षी ७२० कोटी रुपये तुटीचा अर्थसंकल्प

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2018 5:20 AM

काटकसरीच्या मार्गातून बचत, कामगारांच्या भत्त्यात कपात, सवलतींना कात्री असे बचावाचे अनेक मार्गही वर्षभरानंतर बेस्ट ठरलेले नाहीत. त्यामुळे सलग तिसºया वर्षीही बेस्ट उपक्रमाने तब्बल ७२० कोटी रुपये तुटीचा अर्थसंकल्प सादर केला आहे.

मुंबई : काटकसरीच्या मार्गातून बचत, कामगारांच्या भत्त्यात कपात, सवलतींना कात्री असे बचावाचे अनेक मार्गही वर्षभरानंतर बेस्ट ठरलेले नाहीत. त्यामुळे सलग तिसºया वर्षीही बेस्ट उपक्रमाने तब्बल ७२० कोटी रुपये तुटीचा अर्थसंकल्प सादर केला आहे. विद्युत विभागातील स्पर्धा वाढत असताना, वाहतूक विभागाला स्थैर्य देणारे कोणतेही उपक्रम अर्थसंकल्पात दिसून येत नाहीत. तरीही वर्षभरात हजार बसगाड्यांचा ताफा मुंबईकरांच्या सेवेत दाखल करण्याचे आव्हान बेस्ट प्रशासनाने उचलले आहे.महापालिकेच्या शिफारशीनुसार बेस्ट उपक्रमाने कृती आराखडा तयार करीत बचावाचे मार्ग निवडले. मात्र, कामगार संघटनांचा विरोध, बस भाड्याने घेण्याच्या निर्णयाला न्यायालयात आव्हान आणि प्रवाशांच्या संख्येत लक्षणीय घट यामुळे आर्थिक संकटातून बाहेर पडण्याचा कोणताही बेस्ट मार्ग प्रशासनाने दाखविलेला नाही. विशेष म्हणजे, आर्थिक तुटीतून बाहेर पडण्यासाठी वाहतूकतज्ज्ञांकडून घेतलेल्या सल्ल्यांवर विचारही झाल्याचे दिसून येत नाही. वयोमर्यादा संपुष्टात येत असल्याने बेस्टचा ताफा आणखी कमकुवत होणार आहे. बसगाड्या कमी झाल्यामुळे बसच्या फेºयाही कमी होत आहेत.एकही नवीन बसगाडी नाहीसन २०१८-२०१९ मध्ये बेस्ट उपक्रमाने भाडेकरारावर ८०० आणि राज्य सरकारच्या तेजस्विनी योजनेंतर्गत शंभर बसगाड्या खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता. यापैकी चारशे वातानुकूलित आणि विनावातानुकूलित, चारशे विकलांगांसाठी अनुकूल मिडी आणि नियमित व मिनी बसगाड्या घेण्यात येणार होत्या. मात्र, अद्यापही बेस्टच्या ताफ्यात ३,३३७ बसगाड्याच आहेत. म्हणजेच एकही बस वाढलेली नाही. यासंदर्भात न्यायालयात प्रलंबित प्रकरणावर१६ आॅक्टोबरला सुनावणी होणार आहे.अशा आहेत अडचणी : सन २०१८-२०१९ मधील अर्थसंकल्प अद्याप महापालिकेने मंजूर केलेला नाही. वीज विभागातील नफाही कमी झाला आहे.त्यामुळे बेस्ट उपक्रमाची संचित तूट तीन हजार कोटींवर पोहोचली आहे. महापालिकेने आर्थिक मदत देण्यास नकार दिला आहे.निवृत्त कामगारांची थकबाकी देणे बेस्ट उपक्रमाला शक्य झालेले नाही, तसेच कामगार संघटना आणि राजकीय विरोधामुळे बेस्ट बचाव कृती आराखडाही रखडलाच आहे.याआधी शब्द पाळला नाहीप्रवासी अन्य वाहतुकीकडे वळू लागले आहेत. या प्रवाशांसाठी मार्च २०२० पर्यंत ९९३ बसगाड्या घेण्याचा निर्धार प्रशासनाने अर्थसंकल्पातून सोडला आहे. यापूर्वीही अशी घोषणा गेल्या अर्थसंकल्पातून करण्यात आली होती़ मात्र तो शब्द पाळला नाही़प्रवासी संख्याबसगाड्यांच्या फेºया कमी झाल्यामुळे प्रवाशांची प्रतीक्षा वाढली. बसथांब्यावर पाऊण तास थांबावे लागत असल्याने, प्रवाशांनी वाहतुकीचे अन्य पर्याय निवडण्यास सुुरुवात केली. परिणामी, बेस्टचा प्रवासी वर्ग २३ लाखांपर्यंत घसरला आहे. मात्र, तिकीट तपासनीस नसल्यामुळे फुकट्या प्रवाशांची संख्या वाढली असल्याने ही संख्या घटल्याचे दिसून येते.आकडेवारी कोटींमध्येवर्ष उत्पन्न खर्च तूट१९८०-८१ ५४.१५ ६६.९० १२.८३१९८७-८८ १२०.४१ १५६.३३ ३५.९११९९७-९८ ५३८.२४ ६४०.४० १०२.१५२००७-०८ ८५४.८८ १२२६.६९ ३७१.८०२०१७-१८ १७५३.५३ २७९९.४४ १०४५.९१2018-19मध्ये इलेक्ट्रिक मिडी एसी बस ४०, मिडी ६१, मिडी एसी ११, मिडी विना वातानुकूलित २००, इलेक्ट्रिक विना वातानुकूलित ४०, मिनी वातानुकूलित २००बस ताफावर्ष-बसताफा१९९१- २,६१२२००१-३,४३०२०११ -४,३८५२०१७ -३,५००२०१९- ३,७७६२०२० -४,०५०

टॅग्स :बेस्टमुंबई