महिला प्रवाशांसाठी बेस्ट सुरक्षित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2017 02:45 AM2017-08-02T02:45:17+5:302017-08-02T02:45:17+5:30
रेल्वेतून प्रवास करणाºया महिलांमध्ये गेल्या काही दिवसांतील घटनांमुळे भीतीचे वातावरण आहे. मात्र बेस्टचा प्रवास हा महिलांसाठी सुरक्षित असल्याचे बेस्ट समिती अध्यक्ष अनिल कोकीळ यांनी सांगितले.
मुंबई : रेल्वेतून प्रवास करणाºया महिलांमध्ये गेल्या काही दिवसांतील घटनांमुळे भीतीचे वातावरण आहे. मात्र बेस्टचा प्रवास हा महिलांसाठी सुरक्षित असल्याचे बेस्ट समिती अध्यक्ष अनिल कोकीळ यांनी सांगितले. ‘बेस्ट दिना’चे औचित्य साधून महिला प्रवाशांना बेस्टकडे वळविण्यासाठी बेस्टचे प्रयत्न सुरू आहेत, असेही ते म्हणाले. बेस्ट उपक्रम ७ आॅगस्ट रोजी ७०वा वर्धापन दिन साजरा करीत आहे. याबाबत माहिती देताना कोकीळ यांनी ही माहिती दिली.
रेल्वे सेवा ही मुंबईची जीवनवाहिनी आहे. मात्र गेल्या काही दिवसांत रेल्वे प्रवासादरम्यान महिलांसमोर अश्लील चाळे होण्याच्या घटना घडल्या आहेत. याची दखल घेऊन महिलांसाठी बेस्ट प्रवास सुरक्षित करण्याचा बेस्टचा प्रयत्न सुरू आहे. बेस्टचे उत्पन्न व प्रवासी संख्या वाढविण्यासाठी बस आगारांमधील कर्मचारी माईक आणि लाऊडस्पीकरद्वारे प्रवाशांना बसगाड्यांची माहिती देत आहेत.
मात्र बस आगार किंवा बस थांब्याजवळ असलेल्या रिक्षा-टॅक्सीसारख्या वाहनांवर कारवाई करताना पोलिसांचे सहकार्य मिळत नसल्याची खंत कोकीळ यांनी व्यक्त केली आहे.