गणेशोत्सवातील झगमगाटासाठी ‘बेस्ट’ योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2017 06:55 AM2017-08-12T06:55:14+5:302017-08-12T06:55:17+5:30

गणेशोत्सवाचे पडघम मुंबापुरीत वाजू लागले असून, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणेशमूर्ती मंडपात वाजतगाजत दाखल होऊ लागल्या आहेत.

 'Best' scheme for Ganesh Festival's Blaze | गणेशोत्सवातील झगमगाटासाठी ‘बेस्ट’ योजना

गणेशोत्सवातील झगमगाटासाठी ‘बेस्ट’ योजना

Next

मुंबई : गणेशोत्सवाचे पडघम मुंबापुरीत वाजू लागले असून, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणेशमूर्ती मंडपात वाजतगाजत दाखल होऊ लागल्या आहेत.
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना आवश्यक सेवा-सुविधांसाठी महापालिका आणि पोलिसांसह विविध प्राधिकरणांच्या परवानग्यांची आवश्यकता असते. या परवानग्यांच्या पार्श्वभूमीवर याबाबतची प्रक्रियाही वेगाने सुरू असून, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना परवानगीसाठी काही अडथळा निर्माण होऊ नये म्हणून प्राधिकरणेही सज्ज झाली आहेत. यापैकीच एक असलेल्या बेस्ट उपक्रमानेही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना व्यवस्थितरीत्या वीजपुरवठा देता यावा यासाठी कंबर कसली आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी अनधिकृतरीत्या वीजपुरवठा घेऊ नये, असेही आवाहन बेस्टने केले असून, मुंबईमधील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना विद्युत पुरवठा करणारा बेस्ट उपक्रम अत्याधुनिक तंत्रशास्त्र आणि मनुष्यबळासह सज्ज झाला आहे.

बेस्टची चतु:स्तरीय योजना
विद्युत रोषणाईकरिता एक खिडकी योजनेंतर्गत तात्पुरता वीजपुरवठा देणे मार्गप्रकाश योजनेद्वारे श्रींच्या विसर्जनावेळी खास प्रकाशयोजना अत्याधुनिक संपर्क सुविधा यंत्रणा कार्यान्वित करणे आॅनलाइन मागणीपत्र नोंदणी करणे
वीज मीटरची जोडणी करण्यापूर्वी मंडळांनी मागील वर्षीची वीज बिलाची थकबाकी भरावी, मंडपात योग्य क्षमतेचे वायरिंग मान्यताप्राप्त ठेकेदाराकडून करून घ्यावे, ओल्या जमिनीवरून विद्युत तारा टाकू नयेत, मार्गप्रकाश स्तंभांना वायरी गुंडाळू नयेत, वायरचे जोड सुरक्षित करून घ्यावे.
एकूण वापरात येणाºया सर्व विद्युत उपकरणांचा भार लिहावा; जेणेकरून अनधिकृत वीजपुरवठ्याच्या वापरावर निर्बंध घालता येतील.

मागणी अर्ज सादर केल्यानंतर तत्काळ वीजमापक बसविण्याबाबतची तयारी बेस्टने सुरू केली आहे. मंडळांनी वीजचोरीच्या मोहात पडू नये. बेस्टकडूनच विजेचा अधिकृत पुरवठा घ्यावा. अनधिकृत वीजपुरवठा घेतल्यास दुर्घटना घडण्याची भीती आहे. वीजपुरवठा खंडित झाल्यास दोष निवारण कक्षाशी संपर्क साधावा.

विसर्जनावेळी मिरवणूक मार्गावर सुरक्षिततेसाठी अधिक प्रखर प्रकाशयोजना पुरविण्यात येणार आहेत. प्रमुख विसर्जनस्थळे आणि कृत्रिम स्थळे येथेही मनोरे उभारून प्रखर प्रकाशयोजना करण्यात येणार आहे. विसर्जनस्थळी आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाल्यास जीवरक्षकांच्या मदतीकरिता शोध प्रकाशझोत बसविण्यात येणार आहेत.

विद्युत पुरवठा विभागाची सिस्टीम व सुपरवायझरी कंट्रोल २४ तास कार्यरत असून, आणीबाणीच्या काळात संपर्क साधण्याकरिता खास अधिकारी आणि कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत. अधिकारी आणि कर्मचाºयांना विसर्जनस्थळी त्वरित संपर्क साधता यावा याकरिता मोबाइल, बिनतारी संदेश यंत्रणा (वॉकीटॉकी) कार्यान्वित केल्या जाणार आहेत.

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनो हे करा...
रस्ता अथवा फुटपाथवर मंडपाची उभारणी करणाºया गणेश मंडळांनी महापालिकेकडून मंडप उभारणीबाबतचे ‘ना-हरकत प्रमाणपत्र’ अर्जासोबत जोडावे.
संबंधित पोलीस ठाण्याच्या परवानगीची या वर्षीची अथवा गतवर्षीची प्रत अर्जासोबत जोडावी. ज्या गणेश मंडळांना आॅनलाइन मागणी अर्ज करायचे आहेत; त्यांनी बेस्टच्या संकेतस्थळाला भेट द्यावी आणि नोंद केल्यानंतर अर्जाची प्रिंट घेऊन संबंधित ग्राहक सेवा विभागात दाखल व्हावे.
गणेशोत्सव मंडळाने आपला मागणी अर्ज किमान दहा दिवस आधी नोंदविणे.मागणी अर्जात मंडळाचे नाव, संपूर्ण पत्ता व वीजपुरवठा आवश्यक असलेला कालावधी, मंडळाच्या जबाबदार प्रतिनिधीचे नाव, दूरध्वनी क्रमांक लिहावा.
विद्युत निरीक्षकाची परवानगी अथवा त्या खात्याकडे केलेल्या अर्जाची प्रत जोडावी. ज्या केबिनमध्ये तात्पुरता मीटर हवा असेल त्याच केबिनमधील कुठल्याही एका मीटरचे सुरू बिल अर्जासोबत जोडावे.
मंडळाच्या बँकेच्या खात्याची माहिती अर्जामध्ये नमूद करावी. अनामत रकमेचा परतावा एनईएफटीद्वारे मंडळाच्या बँकेच्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी प्रपत्र भरावे.ज्या ठिकाणी मंडपाची व्यवस्था आहे; त्या जागेच्या मालकाची परवानगी आवश्यक आहे. मागणी अर्जावर मंडळाचा रबरी शिक्का असावा.

Web Title:  'Best' scheme for Ganesh Festival's Blaze

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.