मुंबई : पालिका प्रशासनाने दीडशे कोटी रुपयांचे अनुदान दिल्यास भाडेवाढ एकच रुपयाने करण्याची प्रशासनाची अट मान्य करीत सत्ताधारी शिवसेना-भाजपाने अर्थसंकल्प मंजूर केला़ मात्र या भाडेवाढीचा सर्वाधिक फटका शालेय विद्यार्थ्यांना बसणार आहे़ विद्यार्थ्यांचा मासिक पास फेब्रुवारीपर्यंत १२५ रूपयांवरून १८0 रूपये इतका करण्यात येणार आहे़ पालिका महासभेची मंजुरी मिळाल्यास एप्रिल २०१५ पासून हा पास ३६0 रूपयांचा होणार आहे़गेले दोन दिवस सुरू असलेल्या चर्चेनंतर बेस्टचा अर्थसंकल्प बेस्ट समितीच्या बैठकीत आज मंजूर करण्यात आला़ काँग्रेस आणि मनसेने या भाडेवाढीला आपला विरोध दर्शविला़ तरीही विरोधकांचा आक्षेप डावलत भाडेवाढ मंजूर करण्यात आली़ शाळांसाठी सुरू करण्यात आलेल्या विशेष बेस्ट बसच्या भाड्यातही वाढ करण्यात येणार आहे़ त्यामुळे या भाडेवाढीची झळ शालेय विद्यार्थ्यांनाही बसणार आहे़ मुंबईच्या हद्दीतील व हद्दीबाहेरच्या खासगी शाळांतील विद्यार्थ्यांच्या मासिक पासमध्ये याहून अधिक वाढ दिसून येणार आहे़ (प्रतिनिधी)
‘बेस्ट’ स्कूलबसही महागणार
By admin | Published: November 21, 2014 1:13 AM