‘बेस्ट’ला 60 कोटींचा शॉक

By admin | Published: December 7, 2014 01:55 AM2014-12-07T01:55:49+5:302014-12-07T01:55:49+5:30

करून पुरवठा करणा:या बेस्टचा ऊर्जानिर्मितीचा प्रयोग अपयशी ठरला आह़े हरित ऊर्जा निर्मितीसाठी नेमलेल्या कंपनीने चार वर्षानंतरही प्रकल्पाची एक वीटही न रचल्यामुळे बेस्टला 60 कोटींचा शॉक बसला आह़े

'Best' Shock of 60 crores | ‘बेस्ट’ला 60 कोटींचा शॉक

‘बेस्ट’ला 60 कोटींचा शॉक

Next
शेफाली परब ल्ल मुंबई
आर्थिक संकटात बचतीसाठी अवलंबिलेले मार्गही बेस्टवर उलटू लागले आहेत. सद्य:स्थितीत टाटा कंपनीकडून वीज खरेदी करून पुरवठा करणा:या बेस्टचा ऊर्जानिर्मितीचा प्रयोग अपयशी ठरला आह़े हरित ऊर्जा निर्मितीसाठी नेमलेल्या कंपनीने चार वर्षानंतरही प्रकल्पाची एक वीटही न रचल्यामुळे बेस्टला 60 कोटींचा शॉक बसला आह़े
2क्क्8 मध्ये हा प्रयोग करण्याचा निर्णय बेस्टने घेतला़ त्यानुसार राज्यात दोन ठिकाणी प्रकल्प उभे करून 25 मेगाव्ॉट ऊर्जानिर्मितीसाठी स्पार्क ग्रीन एनर्जी प्रा़ लि़ या कंपनीला कंत्रट देण्यात आल़े ही कंपनी जैविक इंधनाच्या माध्यमातून अहमदनगर व सातारा येथे प्रत्येकी 3क् कोटींचे प्रकल्प उभारणार होती़ 3क् जून 2क्1क् र्पयत हा प्रकल्प उभा राहणो अपेक्षित होत़े मात्र दोन वर्षानंतरही या प्रकल्पाच्या दिशेने संबंधित कंपनीने कोणतीच पावले उचललेली नाहीत़ 
अखेर बेस्टने फेब्रुवारी 2क्12 मध्ये कंपनीला कारणो दाखवा नोटीस बजावली होती़ पालिकेच्या लेखापरीक्षण अहवालातही या आर्थिक नुकसानाकडे लक्ष वेधण्यात आले होत़े मात्र 6क् कोटी रुपये वसूल करण्यात बेस्टला यश आलेले नाही़ त्यामुळे महाराष्ट्र राज्य विद्युत नियामक आयोगाकडे दंड भरण्याची वेळ बेस्टवर आल्याचे समजत़े मात्र याबाबत अधिकारी मौन बाळगून आहेत.
 
कंपनीला कारणो दाखवा नोटीस
च्बेस्टच्या विद्युत पुरवठा विभागामार्फत कुलाबा ते सायन/माहीम या पट्टय़ात दहा लाख ग्राहकांना वीज पुरवठा केला जातो़
च्विद्युत पुरवठा विभाग नफ्यात आह़े वाहतूक विभागाची तूट भरून काढण्यासाठी बेस्ट वीज ग्राहकांकडून परिवहन तूट अधिभार व आता अनामत रक्कमही वसूल करीत आह़े
च्अहमदनगर आणि सातारा येथे प्रत्येकी 3क् कोटींच्या एकूण 25 मेगाव्ॉट वीज निर्मितीसाठी बेस्टने 2क्क्8 मध्ये निर्णय घेतला़
च्कंपनीला 13 फेब्रुवारी 2क्1क् रोजी कारणो दाखवा नोटीस बजाविण्यात आल्याचे माहिती अधिकारातून स्पष्ट झाले आहे.

 

Web Title: 'Best' Shock of 60 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.