Join us

१५ फेब्रुवारीपासून बेस्टचे  कर्मचारी जाणार संपावर , 450 बसगाड्या आणि कामगार भाड्याने घेण्यावरून नाराजी  

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2018 7:10 PM

बेस्ट समितीच्या सभेत  450 बसगाड्या आणि कामगार भाड्याने घेण्याचे टेंडर बेस्ट समितीने मंजूर केले असून, हा निर्णय बेस्ट कर्मचाऱ्यांच्या हिताच्या विरोधात असल्याच्या निषेधार्थ येत्या १५ फेब्रुवारी रोजी बेस्टचे कर्मचारी संपावर जाण्याची शक्यता आहे. 

मुंबई - बेस्ट समितीच्या सभेत  450 बसगाड्या आणि कामगार भाड्याने घेण्याचे टेंडर बेस्ट समितीने मंजूर केले असून, हा निर्णय बेस्ट कर्मचाऱ्यांच्या हिताच्या विरोधात असल्याचा आरोप करत बेस्ट संयुक्त कामगार कृति समितीच्या शशांक राव यांनी बंदची हाक दिली आहे. त्यानुसार .येत्या १५ फेब्रुवारी रोजी बेस्टचे कर्मचारी संपावर जाण्याची शक्यता आहे. 

याबाबत बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीचे शशांक राव म्हणाले की, "12 फेब्रुवारी 2018 च्या बेस्ट समितीच्या सभेत 450 बसगाड्या आणि कामगार भाड्याने घेण्याचे टेंडर बेस्ट समितीने मंजूर केले आहे. हे टेंडर बेस्ट कर्मचाऱ्यांच्या हितांच्या विरोधात आहे. आता अस्तित्वाचा लढा सुरु करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे  15 फेब्रुवारीपासून बेस्ट बंद पुकारण्याची वेळ आली आहे. कामगारांनी स्वतःहून  बंद पाळावा." 

टॅग्स :बेस्टमुंबई महानगरपालिकामुंबई