BEST Strike Live : एकाही संपकरी कर्मचाऱ्याची नोकरी जाणार नाही; उद्धव ठाकरेंचं आश्वासन
LIVE
By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2019 07:27 AM2019-01-13T07:27:54+5:302019-01-14T07:04:24+5:30
मुंबई : सुधारित वेतन करार, दिवाळीतील सानुग्रह अनुदान, बेस्ट उपक्रमाचे महापालिकेत विलीनीकरण यांसह उर्वरित मागण्या मान्य करण्यासाठी राज्य सरकारसोबत ...
मुंबई : सुधारित वेतन करार, दिवाळीतील सानुग्रह अनुदान, बेस्ट उपक्रमाचे महापालिकेत विलीनीकरण यांसह उर्वरित मागण्या मान्य करण्यासाठी राज्य सरकारसोबत शनिवारी झालेल्या बैठकीतही ठोस निर्णय झालेला नाही. परिणामी, बेस्ट कामगारांनी पुकारलेला संप रविवारीही सुरूच राहणार असून, सोमवारी यावर ठोस तोडगा निघण्याची शक्यता आहे.
बेस्ट कामगार कृती समितीच्या शिष्टमंडळाची शनिवारी मंत्रालयातील मुख्य सचिवांच्या दालनात बेस्ट संपावर तोडगा काढण्यासाठी बैठक झाली. या बैठकीला मुख्य सचिव डी.के. जैन, परिवहन सचिव आशिष कुमार सिंग, नगरविकास सचिव मनीषा म्हैसकर, महापालिका आयुक्त अजय मेहता, बेस्ट व्यवस्थापक सुरेंद्र कुमार बागडे उपस्थित होते. बैठकीदरम्यान बेस्ट कामगार कृती समितीचे शिष्टमंडळ आणि बेस्ट प्रशासनानेही सविस्तर म्हणणे सरकारसमोर मांडले. सरकारसोबत झालेली बैठक सकारात्मक झाली. मात्र मागण्या मान्य करण्याबाबत सरकारकडून अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. यामुळे संप सुरूच राहणार आहे, अशी माहिती बेस्ट कामगार कृती समितीने ‘लोकमत’ला दिली.
बेस्ट उपक्रमातील 30 हजार कामगारांनी आपल्या विविध मागण्यांसाठी सोमवारी (7 जानेवारी) मध्यरात्रीपासून संप पुकारल्याने मुंबईकरांचे हाल सुरू आहेत.
या मागण्यांसाठी संप
1. महापालिका कर्मचाऱ्यांप्रमाणे 2016-2017, 2017-2018 या काळातील सानुग्रह अनुदान मिळणे.
2.एप्रिल 2016पासून लागू होणाऱ्या वेतन कराराच्या तातडीने वाटाघाटी.
3. अनुकंपा तत्त्वावर तातडीने भरती.
4. बेस्ट उपक्रमाचे महापालिकेत विलीनीकरण करण्याचा महापालिका महासभेत मंजूर झालेल्या ठरावावर अंमल.
5. कामगारांच्या निवासस्थानाचा प्रश्न सोडवणे.
LIVE
04:34 PM
संपावर गेलेल्या एकाही बेस्ट कर्मचाऱ्याची नोकरी जाणार नाही- उद्धव ठाकरे https://t.co/rZAWwZdBuP#BESTSTRIKE
— Lokmat Media Pvt Ltd (@MiLOKMAT) January 13, 2019
04:28 PM
संपावर गेलेल्या एकाही बेस्ट कर्मचाऱ्याची नोकरी जाणार नाही - उद्धव ठाकरे
04:16 PM
संपाबाबत एकत्रित बसून चर्चा केली तर मार्ग निघेल - उद्धव ठाकरे
04:15 PM
अर्थसंकल्पाचं विलीनीकरण करण्याचं आश्वासन मी दिलं होतं ते पूर्ण करू - उद्धव ठाकरे
04:15 PM
बेस्टची आर्थिक स्थिती खराब आहे - उद्धव ठाकरे
10:00 AM
राज्य सरकारसोबतची बैठक सकारात्मक; मात्र बेस्टच्या कामगारांंचा संप मिटेना!
राज्य सरकारसोबतची बैठक सकारात्मक; मात्र बेस्टच्या कामगारांंचा संप मिटेना!https://t.co/f5brsW1Hij#BESTStrike
— Lokmat Media Pvt Ltd (@MiLOKMAT) January 13, 2019
09:45 AM
मुंबई : बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप सहाव्या दिवशीही सुरुच
08:00 AM
लेखी दिल्याशिवाय संप मिटणार नाही
सुधारित वेतन करार, बेस्टचे महापालिकेत विलीनीकरण, कामगारांच्या निवासस्थानाचा प्रश्न; अशा अनेक मागण्या बेस्ट कामगारांनी केल्या आहेत. या मागण्या अडीच वर्षे प्रलंबित आहेत. अडीच वर्षे कामगारांच्या मागणीपत्रावर चर्चा सुरू आहे. कामगारांमध्ये असंतोष आहे. आश्वासनावरच बोळवण होत आहे. कामगारांच्या मागण्या मान्य केल्याचे लेखी दिल्याशिवाय संप मिटणार नाही, या भूमिकेवर बेस्ट कामगार कृती समिती ठाम आहे.
07:30 AM
मुंबई : बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप सहाव्या दिवशीही सुरुच