BEST Strike Live : सर्वसामान्यांना वेठीला धरू नका; हायकोर्टानं बेस्ट कामगारांना फटकारलं
LIVE
By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2019 06:59 AM2019-01-14T06:59:39+5:302019-01-14T13:55:46+5:30
बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपामुळे मुंबईकरांचे हाल सुरुच
मुंबई: बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप न मिटल्यानं मुंबईकरांचे हाल सुरुच आहेत. या संपाबद्दल आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी न्यायालयानं कर्मचाऱ्यांच्या भूमिकेबद्दल तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. सर्वसामान्यांना वेठीला धरू नका, अशा शब्दांमध्ये न्यायालयानं बेस्ट कर्मचाऱ्यांना फटकारलं. यावेळी सरकारचे महाधिवक्ते न्यायालयात हजर नव्हते. त्यामुळे न्यायालयानं या प्रकरणाची सुनावणी तहकूब केली.
बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपाचा आज सातवा दिवस आहे. राज्य सरकारच्या उच्चस्तरीय समितीबरोबर चर्चा झाल्यानंतरही लेखी आश्वासन मिळेपर्यंत बेस्ट कामगार संघटना माघार घेण्यास तयार नाहीत. आज सकाळी मंत्रालयात या प्रश्नी उच्च स्तरीय चर्चा झाली. मात्र त्यानंतरही कर्मचाऱ्यांचा संप आहे. या बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना फोन केला. तर या संपाच्या पार्श्वभूमीवर मनसेप्रमुख राज ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर पोहोचले. मात्र राजकीय नेत्यांच्या या बैठकांच्या सत्रानंतरही बेस्टचा संप सुरूच आहे.
बेस्ट कामगार कृती समितीचं शिष्टमंडळ आणि बेस्ट प्रशासनानंही शनिवारच्या बैठकीत सविस्तर म्हणणं सरकारसमोर मांडलं होतं. मात्र, तोडगा निघाला नव्हता. या संपामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. त्याच वेळी या कालावधीत बेस्ट उपक्रमाचेही १८ कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे. बेस्ट कामगारांनी ७ जानेवारीच्या मध्यरात्रीपासून बेमुदत संप पुकारला आहे. आतापर्यंतचा बेस्ट कामगारांचा हा सर्वात मोठा संप ठरला आहे. घरं रिकामी करून घेणं, मेस्मा कायद्यांतर्गत नोटीस अशा कारवाईनंतरही कामगार मागे हटण्यास तयार नाहीत. अखेर संपाबाबत मुंबई उच्च न्यायालयात याचिकाच दाखल झाल्यानंतर, राज्य सरकारनं कामगारांच्या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन केली. या समितीसोबत झालेल्या बैठकीनंतरही संप मिटलेला नाही.
LIVE
12:22 PM
महाधिवक्ते गैरहजर असल्यानं सुनावणी तहकूब
12:22 PM
सर्वसामान्यांना वेठीला धरू नका; हायकोर्टानं संपावर गेलेल्या कामगारांना फटकारलं
11:40 AM
मंत्रालयातील उच्चस्तरीय बैठक संपली; बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंना फोन
11:39 AM
मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी राज ठाकरे 'वर्षा' बंगल्यावर
10:13 AM
राज ठाकरे थोड्याच वेळात मुख्यमंत्र्यांची भेट घेणार
10:01 AM
संप लवकरात लवकर मिटवावा, संपात राजकारण आणू नये; नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया
10:01 AM
दादरमध्ये टॅक्सीसाठी प्रवाशांची मोठी गर्दी; दादरहून वरळी, प्रभादेवीकडे जाणाऱ्या प्रवाशांच्या लांबच्या लांब रांगा
09:07 AM
धारावीत बस आगारात बेस्ट कर्मचाऱ्यांचं आंदोलन
Mumbai: Seventh day of strike by Brihanmumbai Electricity Supply & Transport (BEST) bus employees over demands of implementation of the merger of the BEST budget with principal budget of the BMC, employee service residences etc; Visuals from Dharavi BEST depot. #Maharashtrapic.twitter.com/asVYl7q8mk
— ANI (@ANI) January 14, 2019
09:00 AM
संपाबाबत थोड्याच वेळात मंत्रालयात बैठक
08:06 AM
बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपामुळे चाकरमान्यांचे हाल; मुंबईकर मेटाकुटीला
07:28 AM
संपामुळे बेस्टचं आतापर्यंत 18 कोटींचं नुकसान
07:06 AM
तोडगा काढला नाही, तर तमाशा करू; बेस्टच्या संपात मनसेची उडी