BEST Strike Live : जोपर्यंत तोडगा निघणार नाही.. तोपर्यंत चर्चा सुरू राहील - बेस्ट महाव्यवस्थापक सुरेंद्र बागडे

LIVE

By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2019 07:50 AM2019-01-09T07:50:44+5:302019-01-09T17:59:37+5:30

मुंबई - बेस्ट कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाचा आज दुसरा दिवस आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांची आजही गैरसोय होणार आहे. मंगळवारी (8 ...

BEST Strike Live : जोपर्यंत तोडगा निघणार नाही.. तोपर्यंत चर्चा सुरू राहील - बेस्ट महाव्यवस्थापक सुरेंद्र बागडे | BEST Strike Live : जोपर्यंत तोडगा निघणार नाही.. तोपर्यंत चर्चा सुरू राहील - बेस्ट महाव्यवस्थापक सुरेंद्र बागडे

BEST Strike Live : जोपर्यंत तोडगा निघणार नाही.. तोपर्यंत चर्चा सुरू राहील - बेस्ट महाव्यवस्थापक सुरेंद्र बागडे

Next

मुंबई - बेस्ट कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाचा आज दुसरा दिवस आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांची आजही गैरसोय होणार आहे. मंगळवारी (8 जानेवारी) मुंबई महानगरपालिका आणि बेस्ट प्रशासनाबरोबर कामगार संघटनांच्या सर्व बैठका निष्फळ ठरल्यामुळे संप चिघळला आहे. या बैठकांमध्ये ठोस असा तोडगा न निघाल्यानं दुसऱ्याही दिवशीही बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप सुरूच राहणार आहे. दुसरीकडे, शिवसेनेनं मंगळवारी संध्याकाळी आयुक्त अजॉय मेहता यांच्याशी चर्चा केल्यानंतर संपाला दिलेला नैतिक पाठिंबा काढून घेतला यामुळे संपात फूट डली आहे. कामगारांच्या मागण्यांवर चर्चा होणार असल्याने काही बसगाड्या रस्त्यावर उतरविणार, असा दावा शिवसेना नेत्यांनी केला आहे. शिवसेना संपातून माघार घेत असल्याचे बेस्ट कामगार सेनेचे नेते सुहास सामंत यांनी जाहीर केले. 

काय आहेत मागण्या?

सुधारित वेतन करार

दिवाळीचा बाेनस

कामगारांच्या निवासस्थानाचा प्रश्न साेडविणे

बेस्टचे महापालिकेत विलीनीकरण

कोट्यवधींचा महसूल बुडाला

सोमवारी मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या संपामुळे मंगळवारी एकही बस रस्त्यावर न आल्यानं बेस्ट उपक्रमाला तीन कोटी रुपयांचे नुकसान झाले. मुंबईच्या रस्त्यांवर दररोज 2,800 बस धावतात आणि त्यातून बेस्ट उपक्रमाला तीन कोटी रुपयांचा महसूल दररोज मिळत असतो. आगामी आर्थिक वर्षात बेस्ट उपक्रमानं 690 कोटी रुपयांची तूट दाखवली आहे. तर दोन हजार कोटी रुपयांची संचित तूट आहे.

(बेस्टच्या संपामुळे मुंबईकरांची दैना!)

मेस्मा अंतर्गत कारवाई

बेस्ट कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप अनधिकृत असल्याचा निर्णय औद्योगिक न्यायालयानं दिला. तसंच संप करू नये, असे आवाहन बेस्ट उपक्रमाने केले. त्यानंतरही संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांवर मेस्मा अंतर्गत कारवाई करणार असल्याचे बेस्ट प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

 

 

LIVE

Get Latest Updates

06:28 PM

संपाच्या पार्श्वभूमीवर खाजगी वाहतूकदारांना प्रवासी वाहतूक करण्याची परवानगी

बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपाच्या पार्श्वभूमीवर खाजगी वाहतूकदारांना प्रवासी वाहतूक करण्याची परवानगी, कार, टॅक्सी, स्कूलबस, तसेच इतर खाजगी वाहनातून करता येणार प्रवासी वाहतूक 

05:21 PM

शिवसेना नको, न्याय हवा, बेस्ट कामगार सेनेच्या कर्मचाऱ्यांनी शिवबंधन तोडले

 बेस्ट कामगार सेनेचे कर्मचारी संपावर ठाम

05:18 PM

जोपर्यंत तोडगा निघणार नाही... तोपर्यंत चर्चा सुरू राहील

संप मागे घ्या. जोपर्यंत तोडगा निघणार नाही,  तोपर्यंत चर्चा सुरू राहील. सर्व बस आगारांमध्ये पोलीस संरक्षण देत आहेत , काही बसेस पोलीस सुरक्षेत सोडत आहोत. बेस्ट महाव्यवस्थापक सुरेंद्र बागडे यांनी दिली माहिती.

04:40 PM

बेस्ट कर्मचारी वसाहतीमधील महिलांनी उद्या सकाळी 11 वाजता वडाळा आगारावर धडक मोर्चाची हाक दिली आहे.

बेस्ट प्रशासनाने कामगारांनी पुकारलेल्या संपामुळे घरे खाली करण्याच्या नोटीस बजावल्याच्या निषेधार्थ मोर्चाची हाक 

04:40 PM

आज संध्याकाळी पुन्हा बैठक घेणार, बेस्ट कामगार संयुक्त कृती समितीचे नेते शशांक राव यांच्या सोबत चर्चा करणार

04:39 PM

संप मागे घ्या! जोपर्यंत तोडगा निघणार नाही, तोपर्यंत चर्चा सुरू राहील. सर्व बस आगारांमध्ये पोलीस संरक्षण देत आहेत. 

काही बसेस पोलीस सुरक्षेमध्ये सोडण्यात येत आहेत, बेस्ट महाव्यवस्थापक सुरेंद्र बागडे यांची माहिती

04:38 PM

मुंबईकरांची गैरसोय टाळण्यासाठी एसटीने 76 बसेस सुरू ठेवल्या  
- कुर्ला पूर्व ते माहूल - 08

- कुर्ला पश्चिम ते बांद्रा - 08

- घाटकोपर ते माहूल - 03

- पनवेल ते मंत्रालय-05

- सीएसटी ते मंत्रालय-10

- सीएसटी ते कुलाबा-10

- कुर्ला पश्चिम  ते सांताक्रूझ 05

- अंधेरी पूर्व ते स्पेस - 05

- दादर ते  मंत्रालय - 05

- बोरिवली ते सायन - 02

- ठाणे ते मंत्रालय-15
 

04:37 PM

बेस्टच्या 350 कामगारांवर मेस्मा लागू 
2000 कामगारांना घर खाली करण्याची नोटीस 
500 कर्मचाऱ्यांवर बेकायदेशीर संप केल्याने कारवाई 

03:09 PM

महापालिकेत स्थायी समितीमध्ये बेस्ट संप प्रकरणी बैठक तहकूब करण्याची विरोधकांची मागणी. शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न, बैठक सुरू ठेवल्याने विरोधकांचा सभात्याग.

03:03 PM

बेस्ट कामगारांना संपातून माघार घेण्यास भाग पाडण्यासाठी बेस्ट प्रशासनाने कर्मचा-यांना मेस्माअंतर्गत बजावली नोटीस.  बेस्ट वसाहतीतील घर खाली करण्याची नाेटीस पाठविण्यास सुरूवात. भाेईवाडा वसाहतीमध्ये कारवाईला सुरूवात.

02:54 PM

बेस्ट संपात फूट पडल्याची शिवसेनेकडून कबुली
बेस्ट प्रश्नावर उद्धव ठाकरे स्वतः लक्ष घालणार 
मराठवाड्याच्या दौऱ्यावरुन आल्यानंतर उद्धव ठाकरे घेणार बैठक

11:39 AM

वडाळा डेपोबाहेर एका बसवर दगडफेक

11:17 AM

मुंबई मेट्रो वन कंपनीकडून मेट्रोच्या 12 अतिरिक्त जादा फेऱ्या वर्सोवा ते घाटकोपर मार्गावर सोडण्यात आल्या आहेत. अंधेरी व घाटकोपर स्थानकावर मेट्रोने प्रवास करण्यासाठी प्रवाशांची मोठी गर्दी.



 

09:18 AM

शिवसेनेच्या बेस्ट संघटनेच्या सभासदांचे सामूहिक राजीनामे
 

08:56 AM



 

08:27 AM

 बेस्ट संपाच्या पार्श्वभूमीवर मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर जास्त लोकल चालवण्यात येणार आहे

08:19 AM

मुंबई सेंट्रल डेपो : संपाच्या दुस-या दिवशीही पहिल्या पाळीतील कर्मचारी कामावर आले नाहीत. सकाळी 6 वाजेपर्यंत केवळ पाच वाहन चालक-वाहक कामावर रूजू झाल्याने तीन बसगाड्या बस आगाराबाहेर काढण्यात आल्या. 

07:55 AM

500 बसगाड्या रस्त्यावर काढण्याचा शिवसेनेचा दावा 
शिवसेनाप्रणित बेस्ट कामगार संघटनेत 11 हजार कामगार सभासद असल्याचा दावा  

07:52 AM

बेस्ट संताप लोकलचा दिलासा



 

Web Title: BEST Strike Live : जोपर्यंत तोडगा निघणार नाही.. तोपर्यंत चर्चा सुरू राहील - बेस्ट महाव्यवस्थापक सुरेंद्र बागडे

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.