इलेक्ट्रिक १९०० बस गाड्यांसाठी ‘बेस्ट’ निविदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:07 AM2021-09-23T04:07:42+5:302021-09-23T04:07:42+5:30

मुंबई : बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात पर्यावरणस्नेही ५० टक्के इलेक्ट्रिक बसगाड्या २०२३ पर्यंत दाखल करण्याचे बेस्ट प्रशासनाचे लक्ष्य आहे. यासाठी ...

'Best' tender for 1900 electric buses | इलेक्ट्रिक १९०० बस गाड्यांसाठी ‘बेस्ट’ निविदा

इलेक्ट्रिक १९०० बस गाड्यांसाठी ‘बेस्ट’ निविदा

Next

मुंबई : बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात पर्यावरणस्नेही ५० टक्के इलेक्ट्रिक बसगाड्या २०२३ पर्यंत दाखल करण्याचे बेस्ट प्रशासनाचे लक्ष्य आहे. यासाठी तब्बल १९०० इलेक्ट्रिक बस गाड्या घेण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यामध्ये दोनशे इलेक्ट्रिक डबल डेकर बसगाड्यांचाही समावेश असणार आहे.

बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात स्वतःच्या व भाडेतत्त्वावरील डिझेल, सीएनजीवर धावणाऱ्या बस गाड्यांसह २८८ इलेक्ट्रिक बसगाड्या आहेत. राज्य सरकारच्या धोरणानुसार सार्वजनिक वाहतूक उपक्रमामध्ये सन २०२५ पर्यंत १५ टक्के ताफा इलेक्ट्रिक बसगाड्यांचा करण्यात यावा, असा नियम आहे. मात्र बेस्ट उपक्रमाने त्याहून अधिक इलेक्ट्रिक बसगाड्या ताफ्यात दाखल करण्याची तयारी केली आहे.

सध्या बेस्ट उपक्रमाच्या २७ पैकी चार बस आगारांमध्ये चार्जिंग स्टेशन आहेत. इलेक्ट्रिक बसचा ताफा वाढल्यानंतर टप्प्याटप्प्याने चार्जिंग स्टेशनही अन्य बस आगारांमध्ये वाढविण्यात येणार आहेत. निविदा मागविण्यात आलेल्या १९०० इलेक्ट्रिक बस गाड्यांपैकी १२ मीटरच्या १४०० बसगाड्या, शंभर मिनी बसगाड्या आणि चारशे मिडी बसगाड्या असणार आहेत.

* बेस्टच्या २७ पैकी चार बस आगारांमध्ये इलेक्ट्रिक बस चार्जिंग स्टेशन्स आहेत. टप्प्याटप्प्याने अन्य बस आगारांमध्येही चार्जिंग स्टेशन सुरू केली जाणार आहेत.

* दीड वर्षाच्या कालावधीत १९०० बसगाड्या टप्प्याटप्प्याने दाखल होणार आहेत. पहिल्या टप्प्यात २५ टक्के म्हणजे ४७५ बसगाड्या पुढील सहा महिन्यांत बेस्टच्या ताफ्यात दाखल होणार आहेत.

बेस्ट उपक्रमात एकूण बसगाड्या ३,२६७

बेस्टच्या मालकीच्या १,९९९

भाडेतत्त्वावरील बसगाड्या १,२६८

डिझेल ९३६

सीएनजी २,१००

इलेक्ट्रिक २३१

बेस्ट उपक्रमाने १९०० इलेक्ट्रिक बस गाड्या घेण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. निविदाकारांनी प्रतिसाद दिल्यानंतर चर्चा करून पुढील निर्णय होईल.

- आशिष चेंबूरकर (अध्यक्ष, बेस्ट समिती)

Web Title: 'Best' tender for 1900 electric buses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.