बोलीभाषा एकांकिका स्पर्धेत ‘तीनसान’ सर्वोत्कृष्ट

By admin | Published: May 11, 2017 02:25 AM2017-05-11T02:25:47+5:302017-05-11T02:25:47+5:30

मराठी रंगभूमीवर विविध नाटकांची निर्मिती करणाऱ्या सुप्रिया प्रॉडक्शन या नाट्यसंस्थेने आयोजित केलेल्या ‘बोलीभाषा एकांकिका’

Best of 'Thrissur' in Linguistic Singles Competition | बोलीभाषा एकांकिका स्पर्धेत ‘तीनसान’ सर्वोत्कृष्ट

बोलीभाषा एकांकिका स्पर्धेत ‘तीनसान’ सर्वोत्कृष्ट

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मराठी रंगभूमीवर विविध नाटकांची निर्मिती करणाऱ्या सुप्रिया प्रॉडक्शन या नाट्यसंस्थेने आयोजित केलेल्या ‘बोलीभाषा एकांकिका’ स्पर्धेत मुंबईच्या ‘सृजन द क्रिएशन’ या संस्थेची ‘तीनसान’ ही एकांकिका सर्वोत्कृष्ट ठरली आहे.
‘माकळ’ (अभिनव, कल्याण) आणि ‘क फालतूगिरी हं’ (व्यासंग, मुंबई) या एकांकिकांनी या स्पर्धेत अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला.
‘भक्षक’ (वर्क इन प्रोग्रेस, कल्याण) या एकांकिकेला लक्षवेधी एकांकिकेचा बहुमान मिळाला.
अशोक मानकर (लेखन-माकळ), अभिजित झुंझारराव (दिग्दर्शन-माकळ), सुनील जाधव (अभिनेता-तीनसान), दिशा दानडे (अभिनेत्री-तीनसान), पृथ्वीक कांबळे (पार्श्वसंगीत-भक्षक), विशाल साठे व प्रमोद बनसोडे (नेपथ्य-अर्धवट गोष्ट), यश नवले (प्रकाशयोजना-भक्षक) यांना सर्वोत्कृष्ट पारितोषिके प्रदान करण्यात आली. रंगकर्मी गिरीश ओक, आनंद म्हसवेकर व विजय पाटकर यांनी या स्पर्धेचे परीक्षक म्हणून काम पाहिले.

Web Title: Best of 'Thrissur' in Linguistic Singles Competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.