बेस्ट तिकिटांच्या विक्रीत वर्षभरात २६ टक्के घट; प्रवाशांची पाठ

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2018 01:11 AM2018-11-20T01:11:23+5:302018-11-20T01:11:32+5:30

आर्थिक संकटात असलेल्या बेस्ट उपक्रमाला आणखी एक झटका बसला आहे. वाहतुकीचे अन्य पर्याय उपलब्ध होत असल्याने, प्रवाशांच्या संख्येत दरवर्षी घट होत आहे.

Best ticket sales fall 26% in a year; Lessons of Passengers | बेस्ट तिकिटांच्या विक्रीत वर्षभरात २६ टक्के घट; प्रवाशांची पाठ

बेस्ट तिकिटांच्या विक्रीत वर्षभरात २६ टक्के घट; प्रवाशांची पाठ

Next

मुंबई : आर्थिक संकटात असलेल्या बेस्ट उपक्रमाला आणखी एक झटका बसला आहे. वाहतुकीचे अन्य पर्याय उपलब्ध होत असल्याने, प्रवाशांच्या संख्येत दरवर्षी घट होत आहे. परिणामी, गेल्या वर्षभरात बेस्टच्या प्रवाशांमध्ये २६ टक्के घट झाली आहे. याचा मोठा फटका बेस्ट उपक्रमाच्या तिजोरीला बसला आहे.
मुंबईची दुसरी जीवनवाहिनी असलेल्या बेस्टच्या बसगाड्यांमधून दररोज सुमारे ४२ लाख प्रवासी दशकभरापूर्वी प्रवास करीत होते. मात्र, बंद पडणाऱ्या बसगाड्या, कमी झालेल्या बस फेºया आणि वाहतूककोंडीमुळे बसगाड्यांना विलंब होत आहे. यामुळे बेस्टचा प्रवासी वर्ग खासगी वाहतुकीकडे वळू लागला आहे. परिणामी, गेल्या काही वर्षांमध्ये प्रवाशी संख्या ४२ लाखांवरून २६ लाखांवर आली आहे.
जून, २०१७ मध्ये दररोजची तिकीट विक्री तीन कोटी रुपये होती. मात्र, वर्षभरात विविध कारणांमुळे ६१ हजारांऐवजी ५९ हजार बस फेºया झाल्या. यामुळे वर्षभरात दोन कोटी २० लाख रुपये उत्पन्न बेस्ट उपक्रमाच्या तिजोरीत जमा झाले आहे. दरम्यान, तिकीट तपासनिसांची संख्याही कमी झाली आहे. याचा फायदा उठवत फुकटे प्रवासी वाढत गेले आहेत, असा आरोप बेस्ट समिती सदस्य सुहास सामंत यांनी अर्थसंकल्पीय भाषणातून केला आहे.

वर्षभरात ५९ हजार फेºया रद्द
बेस्ट उपक्रमाच्या प्रवाशी संख्येत ४२ लाखांवरून २६ लाखांपर्यंत घसरण झाली.
वर्षभरात विविध कारणांमुळे ६१ हजारांऐवजी ५९ हजार बस फेºया झाल्या.
जून, २०१७ मध्ये दररोजची तिकीट विक्री तीन कोटी रुपये होती. वर्षभरात केवळ दोन कोटी २० लाख रुपये उत्पन्न बेस्ट उपक्रमाच्या तिजोरीत जमा झाले आहेत.

Web Title: Best ticket sales fall 26% in a year; Lessons of Passengers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :BESTबेस्ट