बेस्ट घेणार ४ हजार इलेक्ट्रिक बस; इंधन बचत आणि पर्यावरणपूरक सेवेला प्राधान्य

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2022 09:34 AM2022-03-21T09:34:19+5:302022-03-21T09:35:15+5:30

इंधन दरवाढीला पर्याय व  पर्यावरण पूरक प्रवासासाठी बेस्टकडून  हा निर्णय घेतला आहे.

best to buy 4000 electric buses priority to fuel saving and eco friendly service | बेस्ट घेणार ४ हजार इलेक्ट्रिक बस; इंधन बचत आणि पर्यावरणपूरक सेवेला प्राधान्य

बेस्ट घेणार ४ हजार इलेक्ट्रिक बस; इंधन बचत आणि पर्यावरणपूरक सेवेला प्राधान्य

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : महानगरात प्रवासासाठी महत्त्वाचे साधन असलेले बेस्टच्या ताब्यात येत्या काही वर्षात  ४ हजार इलेक्ट्रिक बसेसचा ताफा असणार आहे. इंधन दरवाढीला पर्याय व  पर्यावरण पूरक प्रवासासाठी बेस्टकडून  हा निर्णय घेतला आहे. त्याबाबत विविध स्तरावर नियोजन करण्यात येत असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

गेल्या काही वर्षांपासून इंधन दरवाढ सातत्याने होत आहे. त्याचा मोठा फटका बेस्ट उपक्रमाला बसत आहे. प्रवाशांना त्याचा भुर्दंड बसू नये यासाठी भविष्यात इलेक्ट्रिक बसवर अधिकाधिक वापर  करण्याचे  बेस्टने ठरवले आहे. सध्या बेस्ट वापरत असलेल्या डिझेलच्या फेऱ्यांचा खर्च प्रति किलोमीटर चाळीस रुपये आहे. तर सीएनजीवर चालणाऱ्या बसचा प्रवर्तन खर्च प्रति किमी २६ रुपये आहे. तर इलेक्ट्रिकवर बसगाड्यांचा प्रवर्तन  प्रति किमी ९ रुपये इतका खर्च येतो. 

इलेक्ट्रिक बसमुळे शहरातील प्रदूषण कमी होऊन मुंबईकराना  चांगली आणि किफायतशीर बससेवा देण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद केल्यानुसार डिझेलवरील बसेस या  सीएनजीवर किंवा इलेक्ट्रिकवर चालवण्याच्या दृष्टिकोनातून आवश्यक ते तांत्रिक बदल करण्यासाठी किती खर्च येईल, तसेच या बसगाड्यांची किंमत याच्या आकडेवारीचा बेस्ट प्रशासन विचार करीत आहे.

या बसची स्थिती, भविष्यातील कार्यक्षमता आदीचा तांत्रिक अभ्यास करण्यात येत आहे. त्यासाठी येणाऱ्या खर्चाची आकडेवारी  व  अहवाल निश्चित आल्यानंतरच अंतिम निर्णय घेण्यात येईल. त्यामध्ये आणखी ४००० वातानुकूलित इलेक्ट्रिक बस गाड्या बेस्टच्या ताफ्यामध्ये समाविष्ट केल्या जातील, तर पुढील पाच वर्षांच्या कालावधीमध्ये बेस्टचा एकूण बस ताफा १०,००० इतका असेल, असेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

...तरच डिझेलच्या गाड्यांचा लिलाव 

डिझेलच्या बसगाड्या इलेक्ट्रिक पद्धतीने सुरू करण्यासाठी किती खर्च होईल, त्या विकल्यास त्यातून किती रक्कम मिळेल, याचा अभ्यास बेस्ट उपक्रम करीत आहे त्याच्या फायद्यासाठी जो पर्याय योग्य ठरेल त्याचा वापर केला जाईल,  सध्यातरी  लिलावात काढण्याचा कोणताही विचार नसल्याचे  प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्याबाबत  सोशल मीडियावरून व्हायरल होत असलेल्या  तथ्यहीन बातम्यांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन केले आहे.

Web Title: best to buy 4000 electric buses priority to fuel saving and eco friendly service

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.