आजपासून प्रवास होणार ‘बेस्ट’

By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2020 07:26 PM2020-06-07T19:26:21+5:302020-06-07T19:26:50+5:30

मिशन बिगिन अगेन अंतर्गत सोमवारपासून बेस्ट बस आणखी वेगाने धावणार असून, ज्या लोकांना परमिट देण्यात आले आहेत; असे लोक बेस्टची सेवा वापरू शकतील.

'Best' to travel from today | आजपासून प्रवास होणार ‘बेस्ट’

आजपासून प्रवास होणार ‘बेस्ट’

googlenewsNext

 

मुंबई : मिशन बिगिन अगेन अंतर्गत सोमवारपासून बेस्ट बस आणखी वेगाने धावणार असून, ज्या लोकांना परमिट देण्यात आले आहेत; असे लोक बेस्टची सेवा वापरू शकतील. ते बेस्ट बसमधून प्रवास करू शकणार आहेत, अशी माहिती बेस्ट प्रशासनाकडून देण्यात आली आहे. बेस्टकडून प्राप्त माहितीनुसार, शासनाने आणि मुंबई महापालिकेने जारी केलेल्या आदेशानुसार, या आदेशामध्ये उल्लेख करण्यात आलेल्या नागरिकांना ८ जूनपासून बेस्ट बसमध्ये सामाजिक अंतर ठेवून प्रवास करू देण्याचा घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार, बेस्टच्या बसगाड्यांमध्ये डावीकडे आणि उजवीकडे दोन जणांकरिता असणा-या प्रत्येक आसनावर केवळ एक एकच प्रवासी बसून प्रवास करू शकतो. तसेच केवळ पाच प्रवासी उ•याने प्रवास करतील.

बेस्टचे महाव्यवस्थापक सुरेंद्रकुमार बागडे यांनी लोकमतला यापूर्वीच याबाबतची माहिती दिली होती. तर बेस्ट समितीचे अध्यक्ष अनिल पाटणकर यांनी सांगितले होते की, आम्ही सोमवारी बेस्टमध्ये जाणार आहोत. यावेळी बेस्टच्या महाव्यवस्थापकांसोबत चर्चा करू. त्यांच्याशी संवाद साधू. बेस्टसोबत झालेल्या बैठका, चर्चा यानंतर महापालिकेसोबतही संवाद साधला जाईल. दरम्यान, बेस्टचा आपत्कालीन विभाग १०० टक्के सुरु  आहे. विद्युत विभागात ३५ विभाग आहेत. यात ५ विभाग १०० टक्के सुरु आहेत. उर्वरित ३० टक्के विभाग ५ टक्के सुरु आहे. ऑपरेशन आणि वर्क हे शंभर टक्के सुरु आहे. बेस्ट कामगारांच्या सुरक्षेचा विचार करता कामगारांना सॅनिटायजर दिले आहेत. मास्क दिला जातो आहे. डिस्पोजल मास्कही दिला जातो आहे. लिक्विड सोप पहिल्यापासून दिला जातो आहे. कंटेनमेंट झोनमध्ये जे कामगार काम करण्यास जातात; त्यांना किट आणि शिल्ड दिले जात आहे.

...........................

बेस्टकडून बोरीवली, दिंडोशी, खोदादाद सर्कल, ओशिवरा, सांताक्रूझ, सायन, वांद्रे, धारावी, मुलुंड, घाटकोपर, ठाणे, बेलापूर, मालवणी, विक्रोळी, गोरेगाव, बॅकबे आगार, कुलाबा, मंत्रालय, वरळी, वडाळा, मालाड, मागाठाणे, ट्रॉम्बे, मजास, कुर्ला, अआणि सायन येथूनही बेस्ट बस सोडल्या जाणार आहेत, अशी माहिती बेस्टकडून देण्यात आली.

...........................

मुंबईबाहेरील प्रवाशांसाठी बस

  • विरार ते मालवणी २०
  • नालासोपारा ते गोरेगाव १५
  • नालासोपारा ते पोयसर ५
  • बदलापूर ते सायन १५
  • कल्याण ते सायन १५
  • पनवेल ते सायन १०

 

 

Web Title: 'Best' to travel from today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.