कागदी तिकिटांच्या तुटवड्यामुळे बेस्ट अडचणीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2018 04:38 AM2018-10-24T04:38:33+5:302018-10-24T04:38:35+5:30
ई-तिकीट देणाऱ्या मशिन नादुरुस्त असल्याने, बेस्ट उपक्रमाने ग्राहकांना कागदी तिकीट देण्यास सुरुवात केली आहे.
Next
मुंबई : ई-तिकीट देणाऱ्या मशिन नादुरुस्त असल्याने, बेस्ट उपक्रमाने ग्राहकांना कागदी तिकीट देण्यास सुरुवात केली आहे. मात्र, कागदी तिकिटांचा पुरेसा साठा नसताना बेस्ट समितीच्या बैठकीत कागदी तिकिटांच्या छपाईचा प्रस्ताव मंगळवारी फेटाळण्यात आला. त्यामुळे बेस्ट उपक्रमापुढे नवीन पेच निर्माण झाला आहे.
ई-तिकीट देणाºया कंपनीबरोबर बेस्टने केलेला करार संपुष्टात आला आहे. कागदी तिकीट छापण्यासाठी बेस्ट समितीची परवानगी घेणे आवश्यक आहे. फेब्रुवारी, २०१८ मध्ये बेस्ट समितीने तिकीट छपाईचा प्रस्ताव नामंजूर केला. त्यानंतर, मंगळवारी झालेल्या बेस्ट समितीच्या बैठकीत कागदी तिकीट छापण्यासाठी प्रस्ताव आणण्यात आला. मंगळवारी बहुमताने हा प्रस्ताव फेटाळून लावला.