बेस्टमध्ये सौरऊर्जेचा वापर व्हावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2019 02:04 AM2019-11-08T02:04:12+5:302019-11-08T02:04:31+5:30

मुंबईची दिल्ली होणार नाही : वातावरण फाउंडेशनची आॅनलाइन याचिका

Best to use solar energy | बेस्टमध्ये सौरऊर्जेचा वापर व्हावा

बेस्टमध्ये सौरऊर्जेचा वापर व्हावा

Next

मुंबई : दिल्लीमध्ये हवाप्रदूषणाची भयावह स्थिती आहे. नागरिकांना श्वास घेण्यास त्रास होत आहे. शाळा, कार्यालये बंद ठेवावी लागत आहेत. मुंबईत दिल्लीसारखी प्रदूषणाची स्थिती टाळण्यासाठी बेस्टसारख्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत सौरऊर्जेचा वापर व्हावा या मागणीसाठी वातावरण फाउंडेशनने आॅनलाइन याचिका केली आहे.

बस पूर्णपणे सौरऊर्जेवर आधारित करण्यासाठी एका तासाचा वेळ आवश्यक आहे. यामुळे मुंबईकरांना स्वच्छ आणि आरोग्यदायी भविष्य मिळेल. वाहनांमधून उत्सर्जित होणाऱ्या वायूचे प्रमाण घटेल. सौरऊर्जेवर आधारित बसमुळे मुंबईकरांना शाश्वत भविष्य मिळेल, असे वातावरण फाउंडेशनचे संस्थापक भगवान केशवभट यांनी सांगितले. या याचिकेत त्यांनी म्हटले आहे, मुंबईत सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मजबूत नसल्यामुळे गेल्या पाच वर्षांत खाजगी वाहनांमध्ये ५६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. वाहनांमधून उत्सर्जित होणाºया वायूमुळे मुंबईतील हवेचा दर्जा खालावत आहे. मुंबईत दुसºया क्रमांकाची लाइफलाइन असलेल्या बेस्टने विद्युत बस आणून शहरातील वायुप्रदूषण कमी करण्याच्या दिशेने पाऊल टाकले आहे. सोयीची आणि आर्थिक दृष्टीने परवडणारी बेस्ट ही सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा कणा आहे. पावसाळ्यातही बेस्ट सुरू असते.

राज्यभरात वायुप्रदूषणाची समस्या असून देशातील जास्त प्रदूषण असलेल्या शहरांमधील १८ शहरे महाराष्ट्रातील आहेत. बेस्टने विद्युत बस आणून शहरातील वायुप्रदूषण कमी करण्याच्या दिशेने पाऊल टाकले आहे. विद्युत बसचे चार्जिंग कोळशावर अवलंबून आहे. त्यामुळे आपण हवाप्रदूषणावर अंकुश ठेवू शकत नाही. या समस्येचे निराकरण करण्यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारचे उत्सर्जन न करणाºया सौरऊर्जेचा वापर करायला हवा, असे त्यांनी याचिकेत म्हटले आहे.

मुंबईत दुसºया क्रमांकाची लाइफलाइन असलेल्या बेस्टने विद्युत बस आणून शहरातील वायुप्रदूषण कमी करण्याच्या दिशेने पाऊल टाकले आहे.

Web Title: Best to use solar energy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.