'झारखंड राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी नवनिर्वाचित सरकारला शुभेच्छा!'
By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2019 10:43 PM2019-12-23T22:43:03+5:302019-12-23T22:43:23+5:30
जेएमएमचे नेते हेमंत सोरेन झारखंडचे नवे मुख्यमंत्री होणार हे जवळपास निश्चित झाले आहे.
मुंबई : झारखंड विधानसभा निवडणुकीचे चित्र आता जवळपास स्पष्ट झाले आहे. झारखंडमध्ये भाजपाच्या हातातून सत्ता निसटली आहे.
या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-जेएमएम-राजदच्या महाआघाडीने मुसंडी मारत आघाडी घेतली आहे. त्यामुळे आता महाआघाडीच्या फॉर्म्युल्यानुसार, जेएमएमचे नेते हेमंत सोरेन झारखंडचे नवे मुख्यमंत्री होणार हे जवळपास निश्चित झाले आहे. दरम्यान, महाराष्ट्राचे मुख्यंत्री उद्धव ठाकरे यांनी झारखंड राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी नवनिर्वाचित सरकारला शुभेच्छा दिल्या आहे.
उद्धव ठाकरे यांनी याबाबत ट्विट केले आहे. ते म्हणाले, "झारखंड विधानसभा निवडणुकीत @HemantSorenJMM जी यांच्या नेतृत्वात झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेस आणि आरजेडी युतीने बहुमत प्राप्त करून विजय मिळवल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन! झारखंड राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी नवनिर्वाचित सरकारला शुभेच्छा!"
झारखंड विधानसभा निवडणुकीत @HemantSorenJMM जी यांच्या नेतृत्वात झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेस आणि आरजेडी युतीने बहुमत प्राप्त करून विजय मिळवल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन!
— Office of Uddhav Thackeray (@OfficeofUT) December 23, 2019
झारखंड राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी नवनिर्वाचित सरकारला शुभेच्छा!
दरम्यान, झारखंड विधानसभा निवडणुकीच्या निकालांचा कल स्पष्ट झाल्यानंतर हेमंत सोरेन यांनी झारखंडमधील जनतेचे आभार मानले आहेत. तसेच आजपासून राज्यात एक नवा अध्याय सुरू झाला असून, कुठल्याही जातीधर्माच्या, पंथाच्या, कुठलाही व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीचा अपेक्षाभंग होऊ दिला जाणार नाही, याचे मी आश्वासन देतो, असे हेमंत सोरेन यांनी म्हटले आहे.