Join us

बेस्ट कामगार संघटना संपावर ठाम; प्रशासनाकडून चर्चेसाठी आमंत्रण

By ऑनलाइन लोकमत | Published: January 07, 2019 6:11 AM

कामगार संघटनेत नाराजी : आज होणार निर्णय; ९५ टक्के कामगार संपाच्या बाजूने

मुंबई : कामगारांनी संपाचे हत्यार उपसताच बेस्ट प्रशासनाने दोन दिवस चर्चासत्राचे बोलावणे धाडले आहे. मात्र, गेली अडीच वर्षे केवळ चर्चाच सुरू असल्याने, कामगार संघटना सोमवारी मध्यरात्रीपासून संप पुकारण्याच्या निर्णयावर ठाम आहेत. त्यामुळे प्रशासन आणि कामगार संघटनांमध्ये उद्या होणाऱ्या बैठकीवर या संपाचे भवितव्य अवलंबून आहे

सुधारित वेतन करार, सानुग्रह अनुदान, बेस्टचे महापालिकेत विलीनीकरण आदी मागण्यांसाठी, ७ जानेवारीच्या मध्यरात्रीपासून संपावर जाण्याची हाक बेस्ट कामगार संघटनांनी दिली आहे.  मात्र, या संपामुळे महापालिकेत सत्तेवर असलेल्या शिवसेनेची कोंडी होणार आहे. त्यामुळे महाव्यवस्थापक सुरेंद्र बागडे यांच्याबरोबर बोलणी फिस्कटल्यानंतर स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी मध्यस्थीची तयारी दाखविली होती. मात्र, त्यानंतरही कोणताच तोडगा निघालेला नाही.  दरम्यान, बेस्ट प्रशासनाने कामगार संघटनांना सोमवार आणि मंगळवार असे दोन दिवस चर्चेसाठी बोलावले आहे. हे चर्चासत्र पुढे प्रत्येक आठवड्यात दोन दिवस असणार आहे, परंतु प्रशासनाचा हा प्रस्ताव कामगार संघटनांना मान्य नाही. त्यामुळे उद्याच्या दिवसाभरात हा संप टाळण्यासाठी सत्ताधारी शिवसेनेची भूमिका काय असणार आहे? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.चर्चेत ठरणार संपाचे भवितव्यकामगारांच्या कृती समितीने घेतलेल्या मतदानात ९५ टक्के कर्मचाºयांनी संपाची तयारी दाखविली होती. हा संप टाळण्यासाठी बेस्ट प्रशासनाने कामगार संघटनांबरोबर बेस्ट भवनमध्ये उद्या चर्चा बोलावली आहे.संपकरी कर्मचाºयांवर होणार कारवाईसंपात सहभागी होणाºया कर्मचाºयांवर मेस्मा अंतर्गत कारवाई होईल, असे महाव्यवस्थापक सुरेंद्रकुमार बागडे यांनी स्पष्ट केले आहे.या मागण्यांसाठी संपच्महापालिका कर्मचाºयांप्रमाणे २०१६-२०१७, २०१७-२०१८ या काळातील सानुग्रह अनदान मिळणे.च्एप्रिल २०१६ पासून लागू होणाºया वेतन कराराच्या तातडीने वाटाघाटी.च्अनुकंपा तत्त्वावर तातडीने भरती. च्बेस्ट उपक्रमाचे महापालिकेत विलीनीकरण करण्याचा महापालिका महासभेत मंजूर झालेल्या ठरावावर अंमल.च्कामगारांच्या निवास स्थानाचा प्रश्न सोडविणे.शिवसेनेची कोंडी...बेस्ट कामगार सेना या संपात सहभागी होण्याबाबत संभ्रमात आहे. सत्ताधारी असल्याने शिवसेनेची संघटना संपात सहभागी होऊ शकत नाही. मात्र, कामगारांचा कौल संपाच्या बाजूने असल्याने शिवसेनेची कोंडी झाली आहे. त्यामुळे या संपाला सेना नेत्यांनी नैतिक पाठिंबा दर्शविला आहे. संप अटळ...गेले अडीच वर्षे कामगारांच्या मागणीपत्रावर चर्चा सुरू आहे. संप डोक्यावर आल्याने पुन्हा चर्चेला बोलावित आहेत. मात्र, या वेळेस कामगार ऐकणार नाहीत. उद्या मध्यरात्रीपासून संप अटळ असल्याचे बेस्ट वर्कस युनियनचे सरचिटणीस शशांक राव यांनी सांगितले. 

टॅग्स :बेस्टसंप