मुंबई : पंजाब अँड महाराष्ट्र सहकारी बँकेवरील (पीएमसी) रिझर्व्ह बँकेच्या निर्बंधाने मुंबईतील हजारो खातेदार हवालदिल झाले आहेत. बेस्ट उपक्रमात काम करणाºया काही कर्मचाऱ्यांची खातीही या बँकेत आहेत. मात्र, आपल्या कर्मचाºयांची गैरसाय दूर करण्यासाठी बेस्ट प्रशासनाने या महिन्याचे वेतन धनादेशाने देण्याचा निर्णय घेतला आहे, तसेच दुसºया बँकेत खाते उघडून त्याची माहिती बेस्टला देण्यासाठी कामगारांना एक महिन्याची मुदतही देण्यात आली आहे.पीएमसी बँकेवर निर्बंध आल्यामुळे आपल्या खात्यात जमा असलेली रक्कम काढणेही खातेदारांना कठीण झाले आहे. बेस्ट उपक्रमातील शेकडो कामगारांचे वेतन पीएमसी बँक खात्यात जमा होत असते. मात्र, आता पगार या खात्यात जमा झाल्यास तो काढून घरखर्च चालविणे कामगारांना शक्य होणार नाही. अनेक बेस्ट कर्मचाºयांचे पैसे या बँकेत अडकल्यामुळे त्यांना दैनंदिन खर्चाबाबत चिंता सतावत असून बँकेतील ठेवी काढणे अशक्य असल्याने पैसे परत मिळणार कधी, असा प्रश्नही त्यांना सतावत आहे. त्यामुळे अनेक कामागारांमध्ये तणावाचे वातावरण आहे.पीएमसीच्या विविध शाखांमध्ये बेस्ट उपक्रमातील सुमारे पाचशे कामगारांच्या वेतनाची खाती आहेत. त्यामुळेच त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून आता त्यांना धनादेशाद्वारे वेतन देण्यात येणार आहे. प्रशासनाच्या या निर्णयामुळे पीएमसी बँकेत खाते असलेल्या बेस्ट कर्मचाºयांना दिलासा मिळाला आहे.
बेस्ट कामगारांना मिळणार वेतनाचा धनादेश
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2019 3:35 AM