Join us

बेस्ट कामगारांचा संप सुरू; मुंबईकरांचे होतायेत हाल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 08, 2019 6:16 AM

संप बेकायदेशीर ठरवून कामगारांना आव्हान

मुंबई : बेस्ट कामगारांचा संप टळण्यासाठी गेले काही दिवस सुरू असलेली चर्चा अखेर निष्फळ ठरली. संप मोडून काढण्यासाठी प्रशासनाने ‘मेस्मा’अंतर्गत कारवाईचा इशारा दिला, तसेच औद्योगिक न्यायालयातून संप बेकायदेशीर ठरवून कामगारांनाच आव्हान दिले. यामुळे संतप्त कामगार सोमवारी मध्यरात्रीपासून बेमुदत संपावर गेले आहेत. त्यामुळे मुंबईकर प्रवाशांचे हाल होणार आहे.

सुधारित वेतन करार, बेस्टचे महापालिकेत विलीनीकरण, कामगारांच्या निवासस्थानाचा प्रश्न सोडविण्याची कामगारांची मागणी गेले अडीच वर्षे प्रलंबित आहे. मात्र, प्रशासनाकडून प्रतिसाद मिळत नसल्याने, कामगार संघटनांनी मतदानाद्वारे कामगारांचे मत घेऊन ७ जानेवारीपासून संपाचा इशारा दिला होता. कामगारांच्या मागण्यांवर चर्चा करण्यासाठी गेले काही दिवस चर्चा सुरू होती. मात्र, कोणताच तोडगा न निघाल्याने संपावर ठाम असल्याचे कामगार संघटनांनी जाहीर केले होते. सोमवारी सकाळी या संदर्भात शिवसेना नेते व पालिका प्रशासनामध्ये बैठक झाली. त्यानंतर, पुन्हा दुपारी बेस्ट भवनमध्ये कामगार संघटनांना चर्चेसाठी बोलाविण्यात आले. मात्र, महाव्यवस्थापक सुरेंद्र्रकुमार बागडे पालिका महासभेत बेस्टचा अर्थसंकल्प सादर करण्यासाठी उपस्थित राहिल्याने या बैठकीत पोहोचले नाहीत. त्यामुळे कामगार संघटनेचे नेते वाट पाहून निघून गेले. रात्री उशिरापर्यंत तोडगा काढण्यात येईल, असे आश्वासन बेस्ट समिती अध्यक्ष आशिष चेंबूरकर यांनी दिले होते.कारवाई होणारसंपाचा फटका मुंबईतील जवळपास २५ लाख प्रवाशांना बसणार असल्याने संपात सहभागी होणाऱ्या कर्मचाºयांवर मेस्माअंतर्गत कारवाईचा इशारा महाव्यवस्थापक सुरेंद्र्रकुमार बागडे यांनी दिला आहे. आश्वासनावरच बोळवण गेले अडीच वर्षे कामगारांच्या मागणीपत्रावर चर्चा सुरू आहे. मात्र, कामगारांमध्ये आता प्रचंड असंतोष पसरला आहे. दरवर्षी आश्वासनावरच बोळवण होत आहे. त्यामुळे कामगारांच्या मागण्या मान्य केल्याचे लेखी दिल्याशिवाय संप टळणार नाही, असा इशारा बेस्ट वर्कर्र्स युनियनचे सरचिटणीस शशांक राव यांनी दिला आहे.

 

टॅग्स :बेस्टमुंबई